शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सपनों की उडान’! अनाथ, गरीब मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिले पंख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 11:40 IST

झारखंडमध्ये उपक्रम.

कलामती (झारखंड) : झारखंडच्या दुर्गम खुंटी गावातील अनाथाश्रमात लहानाची मोठी झालेल्या एलिशा हासा (वय १९) हिचा आतापर्यंतचा जीवन प्रवास संघर्ष, समस्या व कठीण परिश्रमांनी भरलेला होता. वंचित वर्गातील विद्यार्थिनींसाठी असलेल्या शाळेत ११ वीला प्रवेश घेण्यापूर्वी अभियांत्रिकी हा शब्द तिच्या कानावरूनही गेला नव्हता.

जिला धडपणे हिंदीसुद्धा बोलता येत नव्हती. अशा या अनाथ, आदिवासी मुलीने सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या जेईई मेन्समध्ये बाजी मारली आहे. तिची स्वप्ने मोठी असून, ती आपल्यासारख्या दारिद्य्राने पिचलेल्या मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू इच्छिते.

एलिशा आता जेईई-ॲडव्हान्सची तयारी करत आहे. तिने सांगितले, मी जेव्हा नऊ वर्षांची होते, तेव्हा माझे मातृ-पितृ छत्र हरपले.  मला एका अनाथालयात पाठवण्यात आले. तेथून मला २०१५ मध्ये शिक्षणासाठी कस्तूरबा गांधी कन्या विद्यालय, कलामती खुंटी येथे पाठविण्यात आले. मला ‘सपनों की उडान’ उपक्रमाची माहिती मिळाली. ज्याने माझ्या स्वप्नांना पंख दिले. मी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. मात्र, गेल्यावर्षी यश मिळू शकले नाही. यावर्षी मला अनुसूचित जनजाती (एसटी) प्रवर्गातून संपूर्ण देशात १,७८८ वे स्थान प्राप्त झाले आहे.

एलिशा एकटी नाही. तिच्यासारखे अन्य नऊ विद्यार्थीही आहेत. ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती असताना व वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत  हिंदी माहीत नसताना कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात प्रवेश घेऊन जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली. आता या सर्वांनी जेईई-ॲडव्हान्सची तयारी सुरू केली आहे. गरिबीतून बाहेर पडून माओवादग्रस्त खुंटी जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हे या सर्वांचे उद्दिष्ट आहे. सर्वांनी एका सुरात त्यांच्या यशाचे श्रेय ‘सपनों की उडान’ला दिले. वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व  वैद्यकीय प्रवेशासाठी विशेष कोचिंग देण्याच्या उद्देशाने खुंटी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. 

बिरसा मुंडा यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय

ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारणारे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांची वंशज सरस्वती मुंडा हिला अत्यंत गरिबीमुळे या विद्यालयात प्रवेश देण्यात आला होता. काहीतरी करून दाखवण्याची चमक तिच्या डोळ्यात दिसते. ती म्हणाली, “मला माझे आजोबा बिरसा मुंडा यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मला माझ्या गावातील लोकांच्या जीवनात ज्ञानाचा दिवा लावायचा आहे.