शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंघोषित संत रामपाल दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये दोषी; हिसार कोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 13:51 IST

16 आणि 17 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणी जाणार

चंदिगढ: स्वयंघोषित संत रामपालला हिसारमधील न्यायालयानं दोन हत्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात न्यायालय 16-17 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं न्यायालयाच्या निकालापूर्वी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. न्यायालयात सुनावणी सुरू असताना तीन किलोमीटर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रामपालवर असलेल्या हत्येच्या आरोपांवर 24 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र राम रहिमवरील आरोपांवरील सुनावणीवेळी झालेला हिंसाचार लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव ऑगस्टमधील सुनावणी टाळण्यात आली. रामपालवर असलेल्या देशद्रोहाच्या आरोपावर 19 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. रामपालच्या सतलोक आश्रमात 18 नोव्हेंबर 2014 रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तर दुसऱ्या एका प्रकरणात रामपालचे भक्त पोलिसांना भिडले होते. तब्बल 10 दिवस पोलीस आणि रामपालचे भक्त यांच्यात धक्काबुकी झाली. यावेळी झालेल्या हिंसाचारात चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळला आहे. त्याला 16 आणि 17 ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येईल. 18 नोव्हेंबर 2014 रोजी रामपालच्या सतलोक आश्रमात एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही महिला रामपालची भक्त होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणीदेखील रामपालविरोधात सुरू असलेल्या इतर खटल्यांच्या सुनावणीसोबत घेण्यात आली. तर दुसरं प्रकरण 19 नोव्हेंबर 2014 चं आहे. त्यावेळी रामपालचे भक्त आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. यावेळी हिंसाचारदेखील झाला होता. त्यात 4 महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांमुळे रामपालच्या अडचणी वाढल्या. आता या दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळला आहे.  

टॅग्स :Haryanaहरयाणा