शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गांधींचे समाजजीवन देशात रुजविण्याची गरज; पद्मश्री बाबा योगेंद्र यांची खास मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:47 IST

‘गांधींनी देशाला दिलेल्या विचारांमध्ये पवित्रतेचे भाव आहेत. देशाला शुद्ध विचार दिला. फाळणीच्या मुद्यावर त्यांच्याशी मी कधीही सहमत होणार नाही, पण त्यांचे समाजजीवन तळागाळापर्यंत रुजविण्याची आज खरी गरज आहे.’

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली - ‘गांधींनी देशाला दिलेल्या विचारांमध्ये पवित्रतेचे भाव आहेत. देशाला शुद्ध विचार दिला. फाळणीच्या मुद्यावर त्यांच्याशी मी कधीही सहमत होणार नाही, पण त्यांचे समाजजीवन तळागाळापर्यंत रुजविण्याची आज खरी गरज आहे,’ असे मत संस्कार भारतीचे संस्थापक पद्मश्री बाबा योगेंद्र (९५) यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ललित कला अकादमी येथे महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित चित्र-शिल्प प्रदर्शनाला त्यांनी आज (बुधवार) भेट दिली. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात काँग्रेसशी जुळलेले अ‍ॅड. विजय बहादूर श्रीवास्तव यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले आहेत. 

महात्मा गांधींच्या नावाने फक्त राजकारण होतेय असे वाटते का? 

- ‘माझ्या जिवंतपणी देशाचे तुकडे होऊ देणार नाही’ असे म्हणणाऱ्या गांधींनी कुणाच्यातरी प्रेमाखातर देशाची फाळणी केली. पण, आपण गांधी या व्यक्तीच्या महानतेविषयी आपण बोलुया. गांधी आणि राजकारण या विषयावर मी बोलणार नाही. त्यांचे साधक जीवन आणि त्यांनी इंग्रजांशी वेळोवेळी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. गांधींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी घटना लोकांना सांगाव्या लागतील. अहिंसा आणि हरीजन हे दोन शब्द त्यांनी दिले. आज एकविसाव्या शतकात इग्लंडमध्ये कुणाच्या तरी मनात गांधींची मूर्ती तयार करण्याचे भाव निर्माण होतात, यावरून त्यांची महानता स्पष्ट होते. 

महापुरुषांची नावे वापरली जात आहेत असे नाही वाटत का?

- आपल्या पुर्वजांचे, आजोबा-पणजोबांचे स्मरण करणे ही देशाची संस्कृती आहे. आम्ही देखील सकाळी उठून प्रार्थना करतो, त्यात महात्मा गांधींसह ५९ महापुरुषांची नावे आहेत. ज्याने जो विचार दिला त्याची गाथा गायलीच जाणार. ज्यांचे स्मरण आम्ही करतो त्यात देशाच्या कानाकोपऱ्यातील महापुरुषांचा समावेश आहे. पण, लोकांना दोषही बघायचा असतो. आता महापुरुषांचे स्मरण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी राहू शकते आणि त्याला आपला इलाज नाही.

भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला आहे, त्याबद्दल काय वाटते?

- सावरकरांना फार पूर्वीच भारतरत्न मिळायला हवा होता. त्यांचा देशासाठी संघर्ष आणि त्यांचे योगदान फार मोठे आहे. दोन जन्मांची शिक्षा कुणाला मिळाली आहे?  एवढ्या यातना सहन केल्यानंतर नंतरच्या सत्तेनेही त्यांच्यावर अन्याय केला. संस्कार भारती त्यांच्या जन्मदिनाला देशभर कार्यक्रम आयोजित करीत असते. 

संस्कार भारतीच्या कामावर समाधानी आहात का?

- समाधान खूप मोठा शब्द आहे. पण आनंद मात्र नक्कीच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कलावंतांमध्ये एकीचा भाव निर्माण करण्यात संस्कार भारतीला यश आले आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साडेतीन हजार कलावंतांमध्ये नागालँड, मिझोरामचे साडेचारशे कलावंत सहभागी होतात तेव्हा आनंद होतो. केरळमधील वायनाड जिल्ह्यात ८९ टक्के मुस्लीम-ख्रिश्चन नागरिक असताना तिथे संस्कार भारतीचे काम सुरू आहे, याचा विशेष आनंद आहे. याच गोष्टी मला या वयात देशभर फिरण्याची प्रेरणा देतात. 

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी