वाळू माफियांनाही हॉकर्सचा दर्जा मनपाचा अजब कारभार : कारवाई न करता एका चौकातून दुसर्या चौकात केले स्थलांतर
By admin | Updated: March 11, 2016 22:26 IST
जळगाव: मनपा अतिक्रमण विभागाने बहिणाबाई उद्यानालगत महामार्गाच्या बाजूने हॉकर्सचे स्थलांतर केले. मात्र तेथे अतिक्रमण केलेल्या वाळू माफियांच्या टपर्यांवर कारवाई करण्याची हिंमत मनपा प्रशासनाची झाली नाही. त्या टपरीधारकांना विनंती करून त्याच रस्त्यावर उद्यानाच्या दुसर्या टोकाला स्थलांतरीत करण्यात आले आहे.
वाळू माफियांनाही हॉकर्सचा दर्जा मनपाचा अजब कारभार : कारवाई न करता एका चौकातून दुसर्या चौकात केले स्थलांतर
जळगाव: मनपा अतिक्रमण विभागाने बहिणाबाई उद्यानालगत महामार्गाच्या बाजूने हॉकर्सचे स्थलांतर केले. मात्र तेथे अतिक्रमण केलेल्या वाळू माफियांच्या टपर्यांवर कारवाई करण्याची हिंमत मनपा प्रशासनाची झाली नाही. त्या टपरीधारकांना विनंती करून त्याच रस्त्यावर उद्यानाच्या दुसर्या टोकाला स्थलांतरीत करण्यात आले आहे. मनपा एकीकडे हॉकर्सला देखील नोटरी करणे बंधनकारक करीत असताना या वाळू माफियांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यास मात्र कचरत आहे. त्यामुळे त्यांनाही मनपाने हॉकर्सचा दर्जा दिला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या टपर्या उद्यानालगतच्या एका चौकातून दुसर्या कोपर्यावरील चौकात स्थलांतरीत झाल्या आहेत.