वाळू व्यावसायिक अजय बढेची कारागृहात रवानगी
By admin | Updated: July 16, 2016 22:37 IST
जळगाव : शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचार्याच्या अंगावर वाळूचे डंपर घातल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी तथा वाळू व्यावसायिक अजय भागवत बढे (वय ३७, रा. के.सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याची शनिवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.
वाळू व्यावसायिक अजय बढेची कारागृहात रवानगी
जळगाव : शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचार्याच्या अंगावर वाळूचे डंपर घातल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी तथा वाळू व्यावसायिक अजय भागवत बढे (वय ३७, रा. के.सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याची शनिवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.शहर पोलिसांनी १३ जुलैला दुपारी १२.३० वाजता अजय बढेला अटक केली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.राजेश गवई यांनी तर संशयितातर्फे ॲड.सागर चौधरी यांनी कामकाज पाहिले.