वाळूच्या डंपरची बालकाला धडक
By admin | Updated: December 9, 2015 23:57 IST
गुन्हा दाखल : चेतन शर्माची पोलिसांशी हुज्जत
वाळूच्या डंपरची बालकाला धडक
गुन्हा दाखल : चेतन शर्माची पोलिसांशी हुज्जतजळगाव: वाळूने भरलेल्या डंपरने फैजल खान हरुल खान या बालकाला बुधवारी सकाळी साडे दहा वाजता शिवाजी नगरातील बौध्द विहाराजवळ धडक दिली. यात सुदैवाने बालकाला काहीही दुखापत झाली नाही, मात्र दुचाकीचे नुकसान झाले आहे. हा डंपर भाजपाचे चेतन शर्मा याचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गुन्हा दाखल होऊ नये यासाठी शर्मा यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या घटनेप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चेतन शर्मा यांच्या मालकीचा वाळूने भरलेला डंपर शहरात येत असताना दुचाकी दुरुस्तीला नेणार्या फैजलला कानळदा रस्त्यावरील बौध्द विहाराजवळ बालकाला जोरदार धडक दिली. यात दुचाकी लांब अंतरावर फेकली गेली, बालकाला कोणतीही इजा झाली नाही. घटना घडल्याचे दिसताच रहिवाशांनी तेथे धाव घेतली. डंपरचालकाविरुध्द पोलीस स्टेशनला दाखल करण्यासाठी गेले असता तेथे चेतन शर्मा याने पोलिसांशी वाद घातला. गजानन मालपुरेच्या सांगण्यावरुन तुम्ही गुन्हा दाखल करता का?, मी तुमचे नाव भाऊंना सांगतो असे म्हणत महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाने धमकी दिली. या सार्या घटनेची नोंद स्टेशन डायरीला घेण्यात आली आहे. संध्याकाळी उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर काही वेळातच वाळू उपसण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.