शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षण मंजूर करा, सोनिया गांधी यांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या बहुमताच्या आधारे सात वर्षे रखडलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करून घ्यावे, अशी विनंती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या बहुमताच्या आधारे सात वर्षे रखडलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करून घ्यावे, अशी विनंती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद असलेले १०८वे घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेने सन २०१०मध्ये मंजूर करून लोकसभेकडे परत पाठविले होते. पण ते लोकसभेत मंजूर झालेले नाही. निवडणूक प्रचारात आश्वासन देणाºया मोदी यांनी हे विधेयक मंजूर करावे, असा आग्रह माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला होता.त्याआधी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही लोकसंख्येच्या ५० टक्के महिलांना आरक्षण द्यायला हवे, असे सांगितले होते.>राजीव गांधींनीच घेतला होता पुढाकारपत्रात सोनिया गांधी म्हणतात की, महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने या विधेयकाचे काँग्रेसने नेहमीच समर्थन केले आहे. यापुढेही आमचा त्यासाठी पाठिंबा राहील. महिलांना पंचायती व नगरपालिकांमध्ये आरक्षण देण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसनेच पुढाकार घेतला. त्या वेळी विरोधी पक्षांनी ते विधेयक बराच काळ राज्यसभेत रोखून ठेवले. परंतु अखेरीस ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती मंजूर होऊन ते आरक्षण प्रत्यक्षात आले, याचेही गांधी यांनी मोदींना स्मरण दिले.>लोकसभेत ६२ महिला सदस्यराजकीय पक्षच कमी महिलांना उमेदवारी देत असल्याने लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अल्प राहिले आहे.टक्केवारीच्या दृष्टीनेही संख्या अत्यल्प असली तरी आजवरची ती सर्वाधिक आहे. याआधीच्या १५व्या लोकसभेत ५८ महिला निवडून आल्या होत्या.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी