शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

समीर जोशी

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

गुंतवणूकदारांना सात

गुंतवणूकदारांना सात
दिवसात ठेवी परत करा

समीर जोशीला सेबीचे आदेश

नागपूर : गुंतवणूकदारांच्या ठेवी वार्षिक १० टक्के व्याज दराने सात दिवसात परत करण्याचे आदेश भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाने (सेबी) श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याला दिले.
जोशी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असल्याने हा आदेश त्याला बजावण्याच्या संदर्भात सरकार पक्षाने एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने आदेश बजावण्याची कामगिरी आर्थिक गुन्हे पथकाकडे सोपवली होती. सोमवारी तपास अधिकारी विष्णू भोये यांनी कारागृहात समीर जोशी याला हा आदेश दिला. न्यायालयात गुंतवणूकदारांचे वकील ॲड. बी. एम. करडे उपस्थित होते.
समीर जोशी याने ठेवी गोळा करून नये, गुंतवणूक संदर्भातील जाहिरातीचे साहित्य काढून घ्यावे, असेही या आदेशात नमूद आहे.
समीर जोशी बीएसई आणि एनएसईचा सब ब्रोकर होता. स्टॉक ब्रोकर मेसर्स किसन रतिलाल चोकसे शेअर्स अँड सेक्युरिटीज प्रा. लि. सोबतही संलग्न होता. त्याने १५ ते २८ महिन्यात दाम दुप्पटचे आमिष दाखवून ५००० कोटी रुपये ६००० गुंतवणूकदारांकडून गोळा केले. व्याज आणि मुद्दल गुंतवणूदारांना परत केले नाही, अशा तक्रारी सेबीला प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सेबीने तपास केला होता.
सेबीच्या तपासात समीर जोशी याने श्रीसूर्या या नावाने सॉफ्ट ड्रिंक्स, इन्फ्रा प्रोजेक्ट, डेअरी अँड फार्म, कॅफे रिटेल, ऑईल अँड एक्सट्रॅक्शनस्, मीडिया नेटवर्क, इन टेक, वेल्थ रिस्क ॲडव्हाझरी, सुपर मार्केट आणि ड्रिम डेस्टिनेशनस्, अशा दहा कंपन्या सुरू केल्या होत्या. त्यापैकी इन टेक या कंपनीत समीर जोशी आणि मनोज तत्त्ववादी तर उर्वरित ९ कंपन्यांमध्ये समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी हे सर्वेसर्वा होते. श्रीसूर्याने ३१ मार्च २०१० पर्यंत ९३४ गुंतवणूकदारांकडून २१ कोटी ३० लाख, २०११ पर्यंत १७६२ गुंतवणूकदारांकडून ४२ कोटी २ लाख आणि २०१२ पर्यंत १९३० गुंतवणूकदारांकडून ५६ कोटी ७३ लाखांच्या ठेवी गोळा केल्या होत्या.
समीर जोशी याला या आदेशावर २१ दिवसात आक्षेप दाखल करण्याची संधीही सेबीने दिली आहे. सेबीचे पूर्ण वेळ सदस्य राजीवकुमार अग्रवाल यांनी हा आदेश २० जानेवारी रोजीच जारी केला होता. हा आदेश सोमवारी बजावण्यात आला.