शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Sambhajiraje: पोलंड सरकारकडून संभाजीराजेंचा सन्मान, इतिहासातील 'या' घटनेचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 12:43 IST

पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो

नवी दिल्ली - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाच्या वतीने मानाचा ‘द बेने मेरिटो’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरातील पोलंड वसाहतीच्या नूतनीकरणासह इंडो-पोलीश संबंध दृढ केल्याबद्दल संभाजीराजे यांची पुरस्कारासाठी निवड झाली होती. याचे वितरण पोलंड प्रजासत्ताकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) दिल्ली येथील पोलंड दूतावासात करण्यात आले. याबाबत, संभाजीराजेंनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली. 

पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५ हजार निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्प मध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते १९४२ ते ४९ या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतिस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती. भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेचाही सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलंड प्रजासत्ताकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते ‘द बेने मेरिटो’ हा पुरस्कार संभाजीराजेंना राजधानी दिल्लीत प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीdelhiदिल्लीShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती