संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण संभाजी आरमार : जय भवानी जय शिवाजीचा जयघोष

By admin | Published: May 14, 2014 01:04 AM2014-05-14T01:04:00+5:302014-05-14T01:04:00+5:30

सोलापूर : जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे संभाजी आरमारच्या वतीने अनावरण करण्यात आले.

Sambhaji Maharaj's unveiling of statue of Sambhaji Maharaj: Jai Bhavani Jai Shivaji's Glory | संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण संभाजी आरमार : जय भवानी जय शिवाजीचा जयघोष

संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण संभाजी आरमार : जय भवानी जय शिवाजीचा जयघोष

Next
लापूर : जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे संभाजी आरमारच्या वतीने अनावरण करण्यात आले.
या उद्घाटन समारंभप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जी. एम. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, अमोल शिंदे, संजय सरवदे, आनंदराव नीळ, योगिराज काटकर, संभाजी ब्रिगेडचे श्रीकांत घाडगे, मनोज शिंदे, गजानन जमदाडे, सुरेश आवताडे, मनोज सरवदे, नागेश कंदलगी आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे काम प्रलंबित होते. शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याने अनावरण करण्यात आले नव्हते; मात्र संतापलेल्या शिवभक्तांनी संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री १२ वा. या पुतळ्याचे हार घालून अनावरण केले. जय भवानी... जय शिवाजी... जय शंभू महाराज...च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून अनावरणाचा उत्सव साजरा करण्यात आला.
कोट...
बर्‍याच वर्षांपासून शिवभक्तांची मागणी होती की, संभाजी आरमारच्या धरणे आंदोलनानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली होती. ना-हरकत प्रमाणपत्राचे क्षुल्लक कारण सांगून महापालिका अनावरण करीत नव्हती. त्यामुळे शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तीने संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याचे अनावरण केले आहे.
श्रीकांत डांगे, अध्यक्ष, संभाजी आरमार.
फोटो ओळ : सोलापुरातील जुना पुणे नाका चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या उद्घाटनाची दिरंगाई पाहून संतापलेल्या संभाजी आरमार व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री १२ वा. शिवशंभूंच्या पुतळ्याचे अनावरण करून जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जी. एम. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, संजय सरवदे, आनंदराव नीळ, योगिराज काटकर, संभाजी ब्रिगेडचे श्रीकांत घाडगे, अमोल शिंदे आदी.

Web Title: Sambhaji Maharaj's unveiling of statue of Sambhaji Maharaj: Jai Bhavani Jai Shivaji's Glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.