शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांसमोर कधीही न झुकलेल्या व्रतस्थ पत्रकाराला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:11 IST

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या रूपाने कणखर टीकाकार आपल्यातून गेले.

आॅगस्टची सुरूवात राजकीय विश्वासाठी अत्यंत वेदनादायी ठरली. करुणानिधी यांचे निधन, तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व सोमनाथ चटर्जी यांचे देहावसान, काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचे अकाली जाणे असे एकावर एक धक्के भारतीय राजकारणाला बसले. आता ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या रूपाने कणखर टीकाकार आपल्यातून गेले.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बसलेला हा मोठा धक्का आहे. त्यांनी धारदार लेखणीतून प्रस्थापित सरकारांच्या विरोधात कोरडे ओढले आहेत. त्यांचा शेवटचा लेख लोकमत टाइम्समध्ये गुरुवारीच प्रसिद्ध झाला. ते लोकमतचे नियमित लेखकच होते.मोदी सरकारने एनआरसीसंबंधातील धोरणांवर त्यांनी चांगलीच टीका ‘इमिग्रंट्स आॅर व्होट बँक’ या लेखातून केली आहे. त्यांनी कधीही कोणत्याही सरकारची बाजू घेतली नाही. नेहमीच आपल्या लेखणीतून चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले. ते १९७१च्या युद्धाचे, आणीबाणीचे साक्षीदार होते. आणीबाणीविरोधात त्यांनी दाखवलेले धैर्य पुढील अनेक पिढीसाठी प्रेरणादायी ठरत गेले. आणीबाणीनंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून आपली लेखणी चालवली. त्यांनी आणीबाणीविषयी लिहिलेल्या ‘द जजमेंट’ या पुस्तकाने त्या काळात देशामध्ये खूपच खळबळ माजली होती.कुलदीप नायर यांचे लेख वाचतच आम्ही पत्रकारितेचा प्रवास करत आलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळावे असे स्वप्न होते. खरे तर सत्तरच्या दशकातील प्रत्येक पत्रकाराचे हेच स्वप्न होते. एकीकडे दिल्लीत पत्रकारांची मोठी फळी सरकारांचे तळवे चाटण्यात धन्यता मानत होती तर दुसरीकडे अशा कुलदीप नायर यांच्यासारख्याव्रतस्थ पत्रकाराचा आदर्श अनेकांसमोर होता.एका नव्या उंचीवर असतानाही त्यांनी आपल्यातला साधेपणा कधीही हरवू दिला नाही. ते पत्रकारांसाठी आदर्श होते. त्यांना भेटण्याची संधी पाच वर्षांपूर्वी मिळाली तेव्हा अनेक वर्षांपासून मनात असलेला प्रश्न विचारला. एक स्वतंत्र विचारांचा पत्रकार सरकारचे पद कसे स्वीकारू शकतो आणि त्यानंतरही स्वत:ला स्वतंत्र कसा म्हणवून घेऊ शकतो?, असा होता तो प्रश्न.ते स्व. लालबहाद्दुर शास्त्री यांचे माध्यम सल्लागार होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वतंत्ररित्या पत्रकारिता सुरू केली होती. त्यानंतर १९९० मध्ये व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवरील प्रश्नावर ते उत्तरले : अहो, कोणतीही गोष्ट करताना आपली तत्वनिष्ठा सोडायची नाही. कधीही नोकरी मागायची नाही आणि कधीच झुकायचे नाही.हा एक मोठा धडा आहे.ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटलेय की, ते असे पत्रकार होते, जे कधीही प्रसिद्धी आणि पैशांच्या मागे धावले नाहीत. आपल्या सद्सदविवेक बुद्धीला जे पटले तेच त्यांनी नेहमी केले. सर्वधर्मसमभावासाठी आणि पत्रकारितेच्या निष्ठेबद्दल ते कायम स्वत:ला कटिबद्ध समजत आणि त्यांनी आणीबाणीच्या काळात दाखवलेल्या धैर्याची उदाहरणे आजही दिली जातील.या व्रतस्थ पत्रकाराला सलाम.-हरिश गुप्तासरकारमध्ये नेमके काय चाललेय याचा असायचा कायम शोधकुलदीप नायर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्यसभेचा सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आले होते. पण त्यांचा पिंड पत्रकारितेचाच होता आणि सरकारमध्ये नेमके काय चाललेय हे त्यांची नजर कायम शोधत असायची.‘बिटविन द लाइन्स’अंजाम नावाच्या एका उर्दू वृत्तपत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी इंग्रजी पत्रकारितेकडे आपली वाटचाल केली. त्यांनी यूएनआय या वृत्तसंस्थेत काम केले. त्यानंतर द स्टेट्समन आणि नंतर इंडियन एक्स्प्रेसच्या माध्यमातून आपल्या शब्दांची धार अनेक सरकारांना दाखवून दिली. ‘बिटविन द लाइन्स’ हा त्यांचा सर्वांधिक वाचला जाणारा कॉलमही त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होता.

टॅग्स :Kuldeep Nayyarकुलदीप नय्यरJournalistपत्रकार