शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक भारतीयाचा लष्कराला सलाम

By admin | Updated: September 30, 2016 02:35 IST

नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले.

नवी दिल्ली : नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले. पाकिस्तानकडून सीमेवर सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि तेथील दहशतवाद्यांनी काश्मिरात घातलेला गोंधळ याच्यामुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण होतेच. उरी हल्ल्यानंतर तर पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, अशी इच्छा भारतीयांमध्ये दिसत होती. त्यामुळेच लष्करी कारवाईची बातमी कळताच, साऱ्या भारतीयांनी तिचे स्वागत केले. आमच्यात एरवी कितीही मतभेद असले तरी देश संकटात असताना सारे भारतीय कसे एकत्र येतात, याचेच दर्शन घडले. लष्करी कारवाईचे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही स्वागत केले. आम्ही पूर्णपणे लष्कराच्या बाजुने उभे आहोत, असे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना या कारवाईची सविस्तर माहिती दिली. काँग्रेसचे नेते अहमद पटेल म्हणाले की, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केल्याबद्दल आम्ही लष्कराचे अभिनंदन करतो. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, लष्करी कारवाईला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लष्करी कारवाईचे भाजपने स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. मोदी यांचे सरकार हे कृतीवर भर देते, शब्दांवर नाही. आम्ही सशस्त्र दलांना प्रणाम करतो। पाकपुरस्कृत दहशतवादापासून आमच्या सीमांचे रक्षण केल्याबद्दल मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करतो. जबाबदार सरकार बोलते कमी व कृती जास्त करते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारचे हे धोरण आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले.दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण ठिकाणांवर जी धाडसी कारवाई केली त्याबद्दल आम्हाला या दलांचा अभिमान वाटतो, असे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले. पाकिस्तानातूनच जन्माला येणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी राजनैतिक पातळीवर वारंवार प्रयत्न करण्यात आले परंतु पाकने वर्तन सुधारून घेतले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मेहबुबा मुफ्ती यांची चिंताश्रीनगर : केंद्रीय गृाहमंत्री राजनाथ सिंग यांनी या कारवाईची माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली होती. त्यानंतर या कारवाईचे परिणाम भारतीय सीमेवर असलेल्या गावांवर होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकारांमुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागेल, असे सांगून, त्यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली.