सलमानची सुनावणी लांबणीवर
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
सलमानची सुनावणी लांबणीवर
सलमानची सुनावणी लांबणीवर
सलमानची सुनावणी लांबणीवर मुंबई: अभिनेता सलमान खानविरोधातील सुनावणीसाठी न्यायालय प्रशासनाने तयार केलेल्या कागदपत्रांवर असमाधान व्यक्त करत ही कागदपत्रे नव्याने तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासनाला दिले़ही कागदपत्रे ११ सप्टेंबरपर्यंत तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ त्यामुळे सलमान खटला पुन्हा लांबणीवर पडला आहे़हिट ॲण्ड रनप्रकरणी दोषी धरत सत्र न्यायालायने मे महिन्यात सलमनाला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली़ याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली़ या याचिकेवर न्या़ ए़ आऱ जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे़ त्यात सलमानने सत्र न्यायालयातील काही कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने सत्र न्यायालयातील खटल्याची कागदपत्रे नव्याने तयार करण्याचे आदेश न्यायालय प्रशासनाला दिले होते़ त्यानुसार तयार झालेली कागदपत्रे न्या़ जोशी यांच्यासमोर सादर झाली़ त्यावर न्यायालयाने असमाधान व्यक्त करत वरील आदेश दिले व ही सुनावणी तहकूब केली़