शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

'मेक इन इंडिया'विषयी कलाम यांनी दिला होता सावधानतेचा इशारा

By admin | Updated: October 18, 2015 15:01 IST

मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेविषयी दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांनी सावधानतेचा इशारा दिला होता.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ -  मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेविषयी दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांनी सावधानतेचा इशारा दिला होता. मेक इन इंडिया ही मोहीम अति महत्त्वाकांक्षी मोहीम असली तरी यामुळे भारत सर्वात स्वस्त उत्पादन केंद्र बनू नये याची दक्षता घेण्याची गरज आहे असे मत कलाम यांनी मांडले होते. सध्याचे राजकारण म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ बनल्याचे कलाम यांना वाटत होते. 
अब्दुल कलाम आणि त्यांचे निकटवर्तीय सृजनपाल सिंह यांनी लिहीलेल्या 'अॅडव्हांटेज इंडिया, फ्रॉम चॅलेंज टू ऑपोर्च्यूनिटी'  या पुस्तकात कलाम यांनी त्यांची मतं मांडली आहेत. या पुस्तकाचे  लवकरच प्रकाशन होणार असून प्रकाशनापूर्वी पुस्तकातील काही भाग आता समोर आले आहेत. 'भारतातील विकासात विभिन्नता आहे. आज दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्राने प्रगती केली आहे, पण अजूनही अनेक गावांपर्यंत वीज व रस्ते पोहोचलेले नाही. आपल्याला पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही' असे मत कमाल यांनी मांडले आहे. मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी मोहीमेची देशाला गरज आहे, मात्र यामुळे भारत सर्वात स्वस्त उत्पादन केंद्र बनू नये, यामुळे विकासाच्या मोबदल्यात जनतेला मोठी किंमत चुकवावी लागेल असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या राजकारणावरही कलाम यांनी पुस्तकात रोकठोख मतं मांडली आहेत. सध्याचे राजकारण संगीत खुर्चाच्या खेळाप्रमाणे बनले आहे. ठराविक नेते आणि त्यांच्या मर्जीतील मंडळी सत्तेवर येतात आणि दुस-यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात.  अशा समुहातील नेत्यांकडे प्रामाणिकपणा नसतो, हे भ्रष्ट नेते त्यांच्याकडील मशाल त्यांच्याच गटातील दुस-या गटातील नेत्याकडे सोपवतात असे परखड मत कलाम यांनी मांडले आहे. राजकारणात सुनियोजित व्यवस्था निर्माण केल्यास नवीन आणि कुशल नेत्यांना संधी मिळेल आणि भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल असे कलाम यांनी नमूद केले.