शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

सलमान सुटला !

By admin | Updated: July 26, 2016 05:39 IST

१८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून

जोधपूर : १८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून राजस्थान उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची सोमवारी निर्दोष मुक्तता केली. चिंकारा हा राजस्थानचा राज्यप्राणी असून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार तो संरक्षित वन्यजीव आहे. जोधपूरजवळील भावाड येथे व त्यानंतरच्या रात्री मथानिया येथील घोदा फार्म येथे मिळून २६ व २७ सप्टेंबर १९९८ दरम्यानच्या रात्री चिंकारा जातीच्या दोन हरणांची अवैध शिकार केल्याचे खटले राजस्थान सरकारच्या वन विभागाने सलमान खानवर दाखल केले होते. सन २००६ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने या दोन खटल्यांमध्ये सलमान खानला अनुक्रमे एक वर्ष व पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या होत्या.सत्र न्यायालयानेही हानिकाल कायम ठेवल्यानंतर सलमान खानने याविरुद्ध राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाकडे दोन अपिले केली होती. न्या. निर्मलजीत कौर यांनी अपुऱ्या पुराव्यामुळे संशयाचा फायदा देत दोन्ही अपिले मंजूर करून सलमान खानची दोन्ही खटल्यांत निर्दोष मुक्तता केली.आजच्या या निकालाच्या वेळी स्वत: सलमान खान न्यायालयात हजर नव्हता. मात्र त्याची बहीण अलविरा उपस्थित होती.

शुक्लकाष्ट कायम...- या निकालामुळे सलमान खानला दिलासा मिळाला असला तरी त्या चित्रिकरणाच्या वेळी केलेल्या कथित अवैध शिकारींच्या आरोपांवरून त्याच्यामागे लागलेले खटल्यांचे शुल्ककाष्ठ पूर्णपणे सुटलेले नाही. आणखी दोन खटल्यांचे निकाल व्हायचे आहेत. त्यापैकी एक खटला ज्याच्या परावान्याची मुदत संपून गेली आहे अशा शस्त्राचा अवैध वापर केल्याबद्दल आर्म्स अ‍ॅक्टखालचा आहे. तर, दुसरा १ व २ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री कांकणी येथे दोन काळविटांची अवैध शिकार केल्यासंबंधीचा आहे.सलमानविरुद्धच्या मुंबईतील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्यातील राज्य सरकारने केलेले अपिलही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यात सत्र न्यायालयाने ठोठावलेली पाच वर्षांची शिक्षा हायकोर्टाने रद्द केली होती.आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे. या निकालाने सलमानसह आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे.- अर्पिता, सलमान खानची बहीणत्या दिवशी वाहन चालविणाऱ्या हरीष दुलानीच्या जबानीवरून सलमानला या खटल्यांत निष्कारण गोवले गेल्याचे आमचे सुरुवातीपासून म्हणणे होते. उच्च न्यायालयाच्या निकालाने तेच सिद्ध झाले. -अ‍ॅड. महेश बोरा, सलमानचे वकीलनिकालपत्राचा सविस्तर अभ्यास केल्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे की नाही याचा राज्य सरकार निर्णय घेईल.-के.एल. ठाकूर, अतिरिक्त महाधिवक्ता, राजस्थान