शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सक्तवसुली संचलनालया(ईडी)ने 15 महिन्यांत 12 हजार कोटींची संपत्ती केली जप्त

By sachin.khutwalkar | Updated: July 30, 2017 20:36 IST

सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने गेल्या १५ महिन्यात जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 30 - सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने गेल्या १५ महिन्यात जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. गेल्या १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त करण्यात आली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे. संसदेत शुक्रवारी एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी नमूद केले की गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या करदात्यांवर अस्थायी अथवा तात्पुरते जप्ती आदेश जारी केल्यानंतर ईडीने ११0३२.२७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.सक्तवसुली संचलनालय (ईडी)च्या अधिकृत वेबसाईटनुसार आर्थिक वर्ष २00५ ते २0१५ च्या दरम्यान जप्त केलेली संपत्ती जवळपास ९ हजार कोटींची आहे. ईडीने चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ९६५.८४ कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली. दरम्यान आर्थिक गुन्ह्यांची नोंद असलेले विजय मल्ल्या यांच्या संपत्तीवर टाच आणायला सक्त वसुली संचलनालयाने प्रारंभ करताच २0१६/१७ वर्षात या आकडेवारीत अचानक मोठी भर पडली. या कालखंडात विजय मल्ल्या यांची १0 हजार कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली. तामिळनाडूतही काही ठिकाणांवर ईडीने धाडी घातल्या. शेखर रेड्डी प्रकरण त्यात सर्वात महत्वाचे आहे.सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सक्त वसुली संचलनालयाच्या उच्चपदस्थांनी आपल्या अधिकाºयांना आदेश बजावले आहेत की देशात जिथे कुठे चुकीच्या मार्गाने पैसे कमवल्याची माहिती प्राप्त होईल, त्या पैशांवर व संपत्तीवर बिनदिक्कत धाडी घाला व आवश्यकता भासल्यास कठोर कारवाई करा. या कारवाईत आयकर विभाग, सीबीआय व सक्तवसुली संचलनालयात पुरेपूर समन्वय राहिल, याची काळजी सर्व विभागांनी घेतली आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयानेही बनावट कंपन्या शोधून काढण्यासाठी याच काळात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती उपरोक्त तीनही यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहे. ज्या बनावट कंपन्यांनी विविध मार्गाने परदेशात परस्पर पैसे पाठवले, त्यांच्या विरोधातही ईडीने वेगवान कारवाई चालवली आहे. एप्रिल २0१७ मधे चेन्नईच्या एका ३६ वर्षिय तरूणाला ईडीने अटक केली. या तरूणाने आपल्या ६ बोगस कंपन्यांव्दारे ७८ कोटींची रक्कम परदेशात पाठवली होती.