शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील जैन दाम्पत्य १00 कोटींच्या संपत्तीचा त्याग करून घेणार संन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:45 IST

आपली तीन वर्षांची मुलगी आणि सुमारे १00 कोटी रुपयांची मालमत्ता त्यागून संन्यास घेण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील एका जैन दाम्पत्याने घेतला आहे.

भोपाळ : आपली तीन वर्षांची मुलगी आणि सुमारे १00 कोटी रुपयांची मालमत्ता त्यागून संन्यास घेण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील एका जैन दाम्पत्याने घेतला आहे.सुमित राठौर (३५) आणि त्यांची पत्नी अनामिका (३४) हे २३ सप्टेंबर रोजी सुरतमध्ये सुधामार्गी जैन आचार्य रामलाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संन्यासदीक्षा घेणार आहेत. हे दाम्पत्य भोपाळपासून ४00 कि.मी. अंतरावरील निमच येथील असून, राठौर कुटुंब स्थानिक राजकारण व व्यवसायात आहे. दाम्पत्याच्या निर्णयाने निमचमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांची तीन वर्षांची मुलगी इभ्या हिचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र निमच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व अनामिकाचे वडील अशोक चंडालिया यांनी सांगितले की, मी नातीचा सांभाळ करेन. दाम्पत्याला समजावणे कठीण आहे. त्यांना कोणीही रोखू शकत नाही.सुमित यांचे वडील राजेंद्रसिंग राठौर यांचा सिमेंट कंपन्यांसाठी गोणपाटाच्या बॅगा बनवण्याचा कारखाना आहे. ते म्हणाले की, आम्हाला याची अपेक्षा होतीच; पण ते इतक्या लवकर हा निर्णय घेतील, असे वाटले नव्हते. सुमित व अनामिका यांच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांना धक्का बसला नाही. इभ्या आठ महिन्यांची असतानाच त्यांनी मुनी बनण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच ते दोघे स्वतंत्रही राहू लागले होते. (वृत्तसंस्था)निर्णयावर दोघे राहिले ठामसुमित यांनी २२ आॅगस्ट रोजी आचार्य रामलाल यांच्या सुरत येथे झालेल्या प्रवचनाच्या वेळी संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. आचार्यांनी त्यांना पत्नीची परवानगी घेण्यास सांगितले.अनामिका यांनी परवानगी तर दिलीच, पण स्वत:ही संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय तातडीने सुरतेला धावले. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.मात्र दोघे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दीक्षा विधी होईपर्यंत त्यांनी मौनव्रत धारण केले आहे. सुमित व अनामिका यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला आहे.