शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

साईंच्या चित्रांची नक्कल करणार्‍यांवर कायद्याचा बडगा शिर्डीत धाडसत्र : निगडीत व्यापार्‍याला अटक

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

शिर्डी : साईबाबांवर अखिल मानवजातीचा हक्क असला तरी चित्रकारांनी स्वयंकल्पनेतून त्यांच्या काढलेल्या चित्रांना मात्र कॉपीराईट लागू आहे़ अशा चित्रांची नक्कल करून हे फोटो विकणार्‍या व्यापार्‍यांना पोलिसांचा पाहुणचार मिळाला आहे़ काल रात्रभर निगडी पोलिसांनी या संदर्भात शिर्डीत वेगवेगळ्या व्यापार्‍यांवर धाडी टाकल्या़

शिर्डी : साईबाबांवर अखिल मानवजातीचा हक्क असला तरी चित्रकारांनी स्वयंकल्पनेतून त्यांच्या काढलेल्या चित्रांना मात्र कॉपीराईट लागू आहे़ अशा चित्रांची नक्कल करून हे फोटो विकणार्‍या व्यापार्‍यांना पोलिसांचा पाहुणचार मिळाला आहे़ काल रात्रभर निगडी पोलिसांनी या संदर्भात शिर्डीत वेगवेगळ्या व्यापार्‍यांवर धाडी टाकल्या़
येथील चित्रकार हेमंत शिवाजी वाणी हे व्यावसायिक चित्रकार असून त्यांची येथे साईबाबा आर्ट गॅलरी आहे़ हेमंत यांनी साईबाबांचे डोळे चारकोल कोळशाने रेखाटले आहेत़ बाबांची कृपादृष्टी या नावाने या चित्रास त्यांनी केंद्र सरकारचे कॉपीराईट मिळवले आहेत़ या चित्रात थोडेफार बदल करून हे चित्र मार्केटला विकले जात होते़ ही बाब हेमंत यांनी वारंवार शिर्डी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली़ मात्र, पोलिसांच्या जुजबी कारवाईने येथील व्यापार्‍यांचे मनोधैर्य बळावले व या फोटोंची सर्रास विक्री सुरू झाली़ अखेर हेमंत यांनी या चित्राच्या हक्काचे संरक्षण करण्याचे अधिकार नगरच्या न्यू इंडिया मल्टी सर्व्हिसेस कंपनीस दिले़
यानंतर गेल्या दोन दिवसापूर्वी या कंपनीच्या तक्रारीवरुन निगडी पोलिसांनी शिर्डीतील एका व्यापार्‍यास पुण्यात सापळा रचून पकडले़ त्याच्याकडून पोलिसांनी कॉपीराईट असलेले सहाशे फोटो, एका गाडीसह दोघांना अटक केली़ या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती़ त्यावेळी केलेल्या चौकशीतून शिर्डीतील आणखी चार मोठ्या व्यापार्‍यांची नावे पुढे आली़ त्यातून निगडी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री शिर्डीतील अनेक व्यापार्‍यांवर धाडी टाकल्या़ अशा प्रकारच्या कारवाया दुकानदार व व्यापार्‍यांवर यापुढेही सुरू राहतील, असे न्यू इंडिया मल्टी सर्व्हिसेस कंपनीचे सुनील त्र्यंबके यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)
----------------------------------------------------------------------------------------------------
3101-2016-साई-01कॉपी राईट असलेले साईंचे डोळे,जेपीजे