शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी, योगींना तुरुंगात टाकायला हवं - अनुपम खेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 14:43 IST

भाजपामध्ये योगी, साध्वी असे काही नेते आहेत, ते बकवास करतात, त्यांना तुरुंगात टाकायला हवं, त्यांना पक्षातूनही हाकलायला हवं असं मत अनुपम खेर यांनी व्यक्त केलं

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 7 - भाजपामध्ये योगी, साध्वी असे काही नेते आहेत, ते बकवास करतात, त्यांना तुरुंगात टाकायला हवं, त्यांना पक्षातूनही हाकलायला हवं असं मत अनुपम खेर यांनी व्यक्त केलं आहे. टेलिग्राफ नॅशनल डिबेटमध्ये बोलताना त्यांनी राहूल गांधींसह भाजपाविरोधकांवर चांगलाच हल्ला चढवला. तसेच भाजपानेही पक्षातल्या वाचाळवीरांवर अंकुश ठेवायला हवा असे मत खेर यांनी व्यक्त केलं.
माझी बायको भाजपाची खासदार आहे, परंतु मी तिच्याशी 30 वर्षे सुखाने संसार करत असल्यामुळे तिला खूश करण्यासाठी भाजपाचं कौतुक करण्याची मला गरज नसल्याचंही खेर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखर चांगलं काम करत असताना, जाणूनबुजून त्यांना बदनाम करण्यासाठी असहिष्णूतेचं पिल्लू सोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राहूल गांधींना सहन करणं ही सगळ्यात मोठी सहिष्णूता असल्याचं उपरोधिकपणे सांगत, या अंगाने काँग्रेसचे नेते सगळ्यात जास्त सहिष्णू असल्याचं ते म्हणाले.
 
 
मोदींनी केलेला जबरदस्त पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला असून एक चहावाला पंतप्रधान कसा होतो हे न पचल्यामुळे असे विषारी हल्ले करण्यात येत असल्याचे खेर यांनी सांगितले.
आठ महिन्यांपूर्वी असहिष्णूता हा शब्दही कुणी ऐकला नव्हता, तो अचानक कुठून आला, असा प्रश्न विचारत खेर यांनी हे जाणुनबुजून रचण्यात आलेलं कारस्थान असल्याचा आरोप केला.