शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राम जागावाटपाचा तिढा सुटला

By admin | Updated: July 10, 2015 00:30 IST

आजपासून कार्यवाही : जगद्गुरू हंसदेवाचार्य यांची यशस्वी मध्यस्थी

आजपासून कार्यवाही : जगद्गुरू हंसदेवाचार्य यांची यशस्वी मध्यस्थीनाशिक : साधुग्राममधील जागांचे आखाड्यांमध्ये वाटप करण्यावरून निर्माण झालेला तिढा आज सायंकाळी अखेर सुटला. उद्या (दि. १०) सकाळी ९ वाजेपासून जागावाटपाला प्रारंभ होणार असल्याची माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास व तिन्ही आखाड्यांच्या महंतांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. हरिद्वार येथील जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी यशस्वी मध्यस्थी करीत हा तिढा सोडवला. आगामी कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणार्‍या साधूंच्या निवासाची व्यवस्था तपोवनातील साधुग्राममध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी आखाडे व खालशांना ठराविक जागेचे (प्लॉट) वाटप केले जात आहे. प्रशासनाने याबाबतचे सर्वाधिकार महंत ग्यानदास यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार काल सकाळी जागावाटपाला प्रारंभ झाला; मात्र प्रशासनाने महंत ग्यानदास यांच्याकडे सर्वाधिकार दिल्याने काही साधू-महंतांनी, विशेषत: दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोर शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काही जागांच्या वाटपावरूनही मतभेद निर्माण झाले होते. ही बाब महंत ग्यानदास यांच्यापर्यंत पोहोचल्यावर ते संतप्त झाले होते. त्यांची प्रकृतीही बिघडली होती. त्यामुळे नाशिक कुंभमेळा आखाडा समन्वयकपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करीत उद्या आपण अयोध्येला प्रयाण करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अनेक साधू-महंतांनी विनवणी करूनही ते आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते. आज सकाळीच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदिंसह प्रमुख अधिकार्‍यांनी ग्यानदास यांची तपोवन मुक्कामी भेट घेऊन मनधरणी केली. दुपारी जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी मध्यस्थी करीत ग्यानदास यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दिगंबर अनी आखाड्यात जाऊन महंत रामकिशोर शास्त्री यांच्यासह साधू-महंतांशीही बोलणी केली. सुमारे पाऊण तासाच्या चर्चेनंतर तिढा सुटल्याचे जाहीर करण्यात आले. आखाड्यात मिठाईचे वाटपही करण्यात आले. त्यानंतर मकवाना हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तिढा सुटल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी जगद्गुरू हंसदेवाचार्य, दिगंबर अनी आखाड्याचे महंत किसनदासजी, महंत रामकिशोर शास्त्री, निर्वाणी अनी आखाड्याचे महंत धरमदासजी, महंत जगन्नाथदासजी, निर्मोही अनी आखाड्याचे महंत अयोध्यादासजी, महंत राजेंद्रदासजी, प्रधान सचिव गौरीशंकरदासजी, प्रेमदासजी, वैष्णवदासजी, श्यामसुंदरदासजी आदि उपस्थित होते. जोड आहे...