गुजरातप्रकरणी तोगडियांचा पोलिसांना सबुरीचा सल्ला
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
नाशिक : गुजरातमध्ये ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांकडून झालेल्या गोळीबारप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पोलिसांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
गुजरातप्रकरणी तोगडियांचा पोलिसांना सबुरीचा सल्ला
नाशिक : गुजरातमध्ये ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांकडून झालेल्या गोळीबारप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पोलिसांना सबुरीचा सल्ला दिला आहे.साधुग्रामधील आखाड्यातील व खालशातील महंतांच्या भेटीप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हिंदूची संख्या घटत आहे. त्यासाठी ५ सप्टेंबरला परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची, तर ६ सप्टेंबरला मुख्य पदाधिकारी व प्रमुख संत, महंत यांची बैठक होणार असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. सदर बैठकीत विचारमंथन होऊन याविषयावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गुजरातची परिस्थिती चिंताजनक आहे, परंतु जनतेनेही शांतता ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रवीण तोगडिया यांनी आज गुरुवारी साधुग्राममधील निर्मोही आखाडा, पहाडीबाबानगर खालशा, निम्बार्कनगर खालशा आदि खालशातील महंतांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. साधुग्राममध्ये सध्या आखाडा अणि खालशांच्या महंतांना भेटी देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसीय दौर्यात आखाडा व खालशातील सर्व महंतांच्या भेटी घेणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आखाडा व खालशांच्या भेटीदरम्यान साधू- महंतांकडून त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले. ( प्रतिनिधी)