शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

S Jaishankar : "विद्यार्थी बसमध्ये असतानाच सुमीत सुरू झाला गोळीबार, PM मोदींनी फिरवला फोन अन्...;"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 17:08 IST

जयशंकर म्हणाले, सुमीच्या एका भागात विद्यार्थी बसमध्ये बसले होते, आम्ही निघणार, तोच पुन्हा गोळीबार सुरू झाला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशाच्या राष्ट्रपतींना फोन केला अन्...

नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम अत्यंत अवघड होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींशी बोलून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा मार्ग तयार केला. आज लोकसभेत ऑपरेशन गंगाबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar in Parliament) म्हणाले, एकादा तर, सुमीमध्ये विद्यार्थी बसमध्ये बसले होते, तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यानंतर स्वतः पंतप्रधानांनीच मोर्चा सांभाळत विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती.

जयशंकर यांनी सांगितला 'तो' थरकाप उडवणारा क्षण -एस जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले, की खार्किवमध्ये गोळीबार सुरू होता. सुमीमध्येही युक्रेन आणि रशिया यांच्यात गोळीबार सुरू होता. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना फोन केला. त्यावेळी मीही तेथे होतो. त्यांनी खार्किवमधील गोळीबार थांबवण्यासंदर्भात पुतीन यांना आवाहन केले. यावेळी, आमचे विद्यार्थ्यांना संकटात आहेत, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले. या संभाषणामुळेच आपल्याला पुरेसा वेळ मिळाला आणि आपले विद्यार्थ्यी खार्किव्ह सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकले.

सुमीमध्ये विद्यार्थी बसमध्ये असतानाच सुरू झाला होता गोळीबार - जयशंकर म्हणाले, सुमीच्या एका भागात विद्यार्थी बसमध्ये बसले होते, आम्ही निघणार, तोच पुन्हा गोळीबार सुरू झाला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशाच्या राष्ट्रपतींना फोन केला. कारण हे दोन्ही लोक दुसऱ्या बाजूने गोळीबार होत असल्याचे सांगत होते. यावेळी, आम्हाला एक ठरावीक वेळ द्या, असे पीएम मोदींनी दोन्ही नेत्यांना समजावून सांगितले. आपण आपल्या सैनिकांना गोळीबार थांबवण्यास सांगितल्यास आम्ही निघू, असे पंतप्रधान म्हणाले. यानंतर दोन्ही देशांनी गोळीबार थांबवला. मग आम्ही युक्रेनची मदत घेतली आणि त्यांचे संरक्षणही घेतले. याशिवाय रेडक्रॉसची मदत घेतली आणि नंतर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. यावेळी जयशंकर यांनी विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुकही केले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद