शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:58 IST

S Jaishankar 670 km road trip America : अमेरिकेतील शटडाऊनमुळे विमान सेवा बंद असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ६७० किमीचा प्रवास कारने केला.

न्यूयॉर्क: अमेरिका फर्स्ट, अमेरिका बलाढ्यची टीमकी वाजवणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेवर जगभरातून नाचक्कीची वेळ आणलेली आहे. अमेरिका खंडाच्या एकेक देशावर दादागिरी करत विस्तारवादाची स्वार्थी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून युक्रेन, चीन, अफगाणिस्तान सारख्या देशांतून खनिजांसाठी स्वार्थ साधणाऱ्या ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टेरिफ लावून ब्लॅकमेलिंग सुरु केले आहे. अशातच सप्टेंबरमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर रस्त्याने शेकडो किमीचा प्रवास करण्याची वेळ अमेरिकेने आणली होती. हे आता बाहेर आले आहे. 

सप्टेंबर २०२५ मधील त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान घडलेला एक प्रसंग आता समोर आला आहे. अमेरिकेतील 'सरकारी शटडाऊन'मुळे विमान सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे जयशंकर यांना तब्बल ६७० किलोमीटरचा (४१६ मैल) प्रवास रस्ते मार्गाने पूर्ण करावा लागला होता. 

सप्टेंबर महिन्यात जेव्हा एस. जयशंकर अधिकृत दौऱ्यावर होते, तेव्हा अमेरिकेत अचानक सरकारी कामकाज ठप्प झाले होते. यामुळे व्यावसायिक उड्डाणे रद्द झाली होती. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशी होणारी महत्त्वाची भेट चुकवता येणार नव्हती. अशा परिस्थितीत अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने त्यांना रस्ते मार्गाने न्यूयॉर्कला नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा अहवाल नुकताच अमेरिकन डिप्लोमॅटिक सिक्युरिटी सर्व्हिसने सार्वजनिक केला आहे. 

कडाक्याची थंडी...७ तासांचा प्रवास आणि गोठवणारी थंडी कॅनडा सीमेजवळील लेविस्टन-क्वीनस्टन पुलापासून हा प्रवास सुरू झाला. कडाक्याची थंडी आणि दुर्गम भागातून जाणारा रस्ता असतानाही ७ तासांत जयशंकर यांचा ताफा मॅनहॅटनमध्ये पोहोचला. या प्रवासात २७ सुरक्षा एजंट त्यांच्यासोबत होते. या प्रवासावेळी न्यूयॉर्क शहरात प्रवेश करताना जयशंकर यांच्या ताफ्यासमोर एक अपघात झालेली महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. 'हिट अँड रन'ची केस होती. परराष्ट्र मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल असतानाही, सुरक्षा पथकाने ताफा थांबवला. एका एजंटने त्या महिलेला प्राथमिक मदत दिली, तर इतरांनी ट्रॅफिक नियंत्रित केले जेणेकरून रुग्णवाहिका तातडीने पोहोचू शकेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaishankar's 670km US Road Trip: Trump's America Troubles?

Web Summary : US 'shutdown' forced Jaishankar to travel 670km by road in America. Flight cancellations meant he almost missed a UN meeting. Security helped an accident victim en route.
टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका