शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : 'ऑपरेशन गंगा'मध्ये हवाई दल सामील होणार; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी C-17 विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 13:34 IST

Ukraine Russia War : आतापर्यंत 2016 भारतीय युक्रेनमधून परतले आहेत. आजही अनेक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतणार आहेत.

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने आपली मोहीम तीव्र केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना परत आणण्याच्या सूचना हवाई दलाला दिल्या आहेत. आज मंगळवारपासून हवाई दलाची अनेक सी-17 विमानेही सज्ज करण्यात येणार आहेत. ही विमाने भारतातून युक्रेनपर्यंत मदत सामग्री घेऊन जातील. आतापर्यंत 2016 भारतीय युक्रेनमधून परतले आहेत. आजही अनेक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतणार आहेत.

दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज सहावा दिवस आहे. 24 फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. युक्रेनमधील परिस्थिती अजूनही वाईट आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे. सोमवारी बेलारूसच्या सीमेवर रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. मात्र, चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू करण्यात आली. केंद्र सरकारने 26 फेब्रुवारीला ऑपरेशन गंगाची सुरुवात केली. मंगळवारी सकाळी एअर इंडियाची सातवी फ्लाइट 182 भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्ट, रोमानिया येथून मुंबईला पोहोचली एअर इंडियाची फ्लाइट IX1202 मुंबई विमानतळावर पोहोचली, त्यावेळी या भारतीय नागरिकांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले.

दरम्यान, काल बुडापेस्टहून सहावी फ्लाइट 240 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीला पोहोचली, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. त्यांनी ट्विट केले की, बुडापेस्टहून सहाव्या ऑपरेशन गंगा फ्लाइटने 240 भारतीय नागरिकांना दिल्लीला आणले. तसेच, अजून युक्रेमधून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

चार केंद्रीय मंत्र्यांकडे जबाबदारी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू, व्हीके सिंग आणि हरदीप सिंग पुरी यांना युक्रेमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया रोमानिया आणि मोल्दोव्हाला, किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला आणि व्हीके सिंग पोलंडला जाणार आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाindian navyभारतीय नौदल