शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: 'ऑपरेशन गंगा'मध्ये 24 मंत्री, 80 उड्डाणे; 'असा' आहे भारतीयांच्या परतीचा पूर्ण प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:46 IST

Operation Ganga: रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. गेल्या 8 दिवसांपासून रशियाने युक्रेनची मोठी हानी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले आहे.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे(Russia-Ukraine War) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीयांना परत आणले जात आहे. केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 80 उड्डाणे तैनात केली आहेत. या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

'ऑपरेशन गंगा'टीमचे काम सुरूयुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने बचाव कार्याला गती दिली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अधिकाधिक भारतीयांना आणण्यासाठी सर्व फ्लाइट्सच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 10 मार्चपर्यंत एकूण 80 उड्डाणे तैनात करण्याचे नियोजन आहे. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून 35 विमाने निघण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यात एअर इंडियाच्या 14, एअर इंडिया एक्स्प्रेसची 8, इंडिगोची 7, स्पाइसजेटची 1, विस्ताराची 3 आणि भारतीय हवाई दलाची 2 उड्डाणे आहेत.

बुडापेस्ट येथून 28 उड्डाणे होणार हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एकूण 28 उड्डाणे होणार आहेत. या 28 पैकी 15 उड्डाणे गो एअरची, 9 इंडिगोची, 2 एअर इंडियाची, 1 भारतीय हवाई दलाची आणि 1 स्पाईसजेटची आहे. रझेजो, पोलंड येथून एकूण 9 उड्डाणे नियोजित आहेत, ज्यात इंडिगोची 8 उड्डाणे आणि भारतीय वायुसेनेची 1 उड्डाणे समाविष्ट आहेत, तर 5 उड्डाणे सुसेवा, रोमानिया आणि 3 उड्डाणे कोसिसिस, स्लोव्हाकिया येथून उड्डाण करतील. बुडापेस्ट, बुखारेस्ट आणि रझेजो, सुसेवा आणि कोसीस येथून उड्डाण करणार्‍या या 80 फ्लाइट्समधून सुमारे 17,000 अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढले जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

आतापर्यंत 24 उड्डाणे भारतात आली 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 2 मार्चपर्यंत एकूण 24 उड्डाणे भारतात आली आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारने 26 फेब्रुवारीला ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले. भारतीयांना घेऊन येणारे पहिले विमान 26 फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल झाले, ज्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केले होते. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी चार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंग पुरी, किरेन रिजिजू आणि व्हीके सिंग यांना हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंडला पाठवले आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर ऑपरेशन गंगा अंतर्गत हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून येणाऱ्या भारतीयांना सुरळीतपणे बाहेर काढण्यासाठी देखरेख करण्याची जबाबदारीही मोदी सरकारने मंत्र्यांना दिली आहे.

केंद्रीय मंत्र्यांकडे मोठी जबाबदारीमंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, राव इंद्रजित सिंग, नारायण राणे, जी किशन रेड्डी, कैलाश चौधरी, पुरुषोत्तम रुपाला, भगवंत खुबा, वीरेंद्र कुमार, मीनाक्षी लेखी, व्ही. मुरलीधरन, भागवत कराड, निसीथ प्रामाणिक, रतनू साहिब ठाकूर, रतनू साहिब, दर्शन जरदोश, देवुसिंह चौहान, भारती प्रवीण पवार, साध्वी निरंजन ज्योती, भानु प्रताप सिंग वर्मा, सुभाष सरकार, कपिल पाटील यांना युक्रेनच्या शेजारील देशांतून भारतीयांना घेऊन जाणारी विमाने प्राप्त करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीय