शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Russia-Ukraine War: रशियन रणगाडे असे कसे उद्ध्वस्त झाले? युक्रेन युद्धावरून भारतीय सैन्य चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:07 IST

युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. हे रणगाडे भारतीय सैन्य देखील वापरते.

युक्रेनच्या सैन्याने रशियन रणगाड्यांना अशाप्रकारे उध्वस्त केलेय की रशियन फौजांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. युक्रेन आज ताब्यात घेऊ, उद्या ताब्यात घेऊ म्हणणाऱ्या रशियाला आज ४६ दिवस झाले तरी विजय घोषित करता आलेला नाही. उलट ताब्यात आलेले प्रदेश सोडावे लागत आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे भारतीय सैन्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

या युद्धावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे. या युद्धातून शहाणे होत भारतीय सैन्य आपल्या रणगाड्यांमध्ये बदल करणार आहे. भारताकडे रशियासारखेच रणगाडे आहेत. यामुळे जमिनीवरील युद्धाचा धोका असलेल्या भारताला पाकिस्तान, चीनकडून मोठा धोका आहे. यामुळे रशियाच्या अवस्थेचा अभ्यास करून भारतीय सैन्य पुढील काळात आपल्या रणगाड्यांमध्ये बदल करणार आहे. 

युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. युक्रेनने याचाच फायदा उठवत अँटी टँक गायडेड मिसाईचा तुफान वापर केला आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकेची आणि युरोपीय देशांची जरी असली तरी आपण तयार राहिलेले चांगले असा विचार भारताने केला आहे. 

युद्धभूमी बनलेल्या युक्रेनमधील प्रत्येक घडामोडींवर भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर आणि अधिकारी लक्ष ठेवून आहेत, कारण तेथील लढाईत वापरल्या जाणार्‍या रणगाड्यांसह अनेक युद्धसामुग्री भारताशी साधर्म्य साधणारी आहे. तेथून मिळणाऱ्या माहितीचे गांभीर्याने विश्लेषण केले जात आहे. सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, येत्या काही वर्षांत भारतीय सैन्याला मिळणाऱ्या रणगाड्यांमध्ये युक्रेन-रशिया युद्धातील इनपुट्स वापरून बदल केले जातील. 

भारत का चिंतेत...T-90, T-72 आणि BMP मालिकेतील रणगाड्यांसह रशियन आर्मर्ड वाहने भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. भारतीय लष्कराने यापूर्वी हे रणगाडे वाळवंट आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केले होते, परंतु आता ते चीनच्या सीमेवरही तैनात आहेत. लडाखपासून सिक्कीमपर्यंत हे रणगाडे मोठ्या संख्येने भारताच्या सीमांचे रक्षण करत आहेत. असे असताना भारतीय सैन्याला रशियाची हे रणगाडे अपयशी ठरले तर आपल्याला त्याचा फटका बसेल असे वाटत आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndian Armyभारतीय जवान