शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: आज युक्रेनमधून 3726 भारतीय परतणार, आतापर्यंत 17000 मायदेशात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:52 IST

Russia-Ukraine Crisis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला 'ऑपरेशन गंगा'मध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. भारतीय हवाई दल त्यांच्या मालवाहू आणि वाहतूक विमानांसह बचाव कार्य करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, C-17 ग्लोबमास्टर आणि IL-76 विमाने एका वेळी सुमारे 400 प्रवाशांसह लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहेत.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे(Russia-Ukraine War) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीयांना परत आणण्यात आले असून, आजही युक्रेनमधून 3726 भारतीय परतणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे(jyotiraditya scindia) यांनी गुरुवारी ही माहिती दिली. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटरवर माहिती देताना सांगितले की, 'ऑपरेशन गंगा अंतर्गत, बुखारेस्ट येथून 8 फ्लाइट, सुसेवा येथून 2 फ्लाइट, कोसीस येथून 1 फ्लाइट, बुडापेस्ट येथून 5 फ्लाइट आणि रज्जो येथून 3 फ्लाइटने 3726 भारतीयांना आज घरी आणले जाणार आहे."

विद्यार्थ्यांनी सरकारचे मानले आभार युक्रेनमधून सुटका करुन गुरुवारी दिल्ली विमानतळावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी भारत सरकारचे आभार मानले. भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी तातडीने कारवाई केली. भारतीय असल्याचा अभिमान आहे. तर, भारतीय विद्यार्थिनी उज्जला गुप्ता युद्धग्रस्त युक्रेनमधून सुखरूप मायदेशी परतल्यावर दिल्ली विमानतळावर तिचे पालक आणि नातेवाईकांनी जोरदार स्वागत केले. तिनेही भारत सरकारचे आभार मानले.

'ऑपरेशन गंगा'मध्ये भारतीय वायुसेना सहभागीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला 'ऑपरेशन गंगा'मध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. भारतीय हवाई दल त्यांच्या मालवाहू आणि वाहतूक विमानांसह बचाव कार्य करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, C-17 ग्लोबमास्टर आणि IL-76 विमाने एका वेळी सुमारे 400 प्रवाशांसह लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहेत. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर वाहतूक विमानाने काबूलमधून नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आतापर्यंत सुमारे 17000 भारतीयांनी युक्रेन सोडले आहेकीवमधील भारतीय दूतावासाने अॅडव्हायजरी जारी केल्यापासून आतापर्यंत एकूण 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत उड्डाणे वाढवण्यात आली आहेत. युक्रेन सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही भारतीयांचा समावेश आहे ज्यांनी यापूर्वी कीवमधील भारतीय दूतावासात नोंदणी केली नव्हती. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेairforceहवाईदल