शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

गुजरातेत रूपानींचे सरकार सत्तारूढ

By admin | Updated: August 8, 2016 04:40 IST

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसोबत गुजरातेत विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले असून, मावळत्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल

अहमदाबाद : मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसोबत गुजरातेत विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले असून, मावळत्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना वगळत गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुका ध्यानात घेऊन नवीन मंत्रिमंडळात जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला.मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखालील २५ जणांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरातेत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपद निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वटरवरून मुख्यमंत्री विजय रूपानी आणि नितीन पटेल यांचे अभिनंदन केले आहे.गुजरातेत २०१७ अखेर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रूपानी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळात जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. पटेल समुदायाच्या ८ नेत्यांचा, ओबीसीच्या ८, क्षत्रिय समुदाच्या तीन, आदिवासी समुदायाच्या दोन, तर ब्राह्मण, जैन, सिंधी आणि दलित समुदायाच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विजय रूपानी हे गुजरातचे नववे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे सौराष्ट्र, उत्तर, दक्षिण व मध्य गुजरातला प्रतिनिधित्व देण्यात आले. नरोडा येथील आमदार निर्मला वधवानी या मंत्रिमंडळात एकमेव महिला सदस्य आहेत. मंत्रिमंडळात ८ कॅबिनेट, तर १६ राज्यमंत्री आहेत. उ महात्मा मंदिर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्ष वर्धन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आनंदीबेन पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वृत्तसंस्था)या मंत्र्यांना वगळले : आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात असलेले रजनीभाई पटेल, वसुबेन त्रिवेदी, सौरभ पटेल, गोविंद पटेल, छत्रसिंह मोरी, ताराचंद छेडा आणि कांतीभाई गमीत यांना वगळण्यात आले आहे. ३ आॅगस्ट रोजी आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला होता. ८ कॅबिनेट मंत्री : नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, गणपत वसवा, बाबू बोखिरिया, दिलीप ठाकूर, जयश रादादिया, चिमण सपारिया आणि आत्मराम परमार.