शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रुंगटा यांना चार वर्षांचा कारावास

By admin | Updated: April 5, 2016 00:02 IST

कोळसा वाटप घोटाळ्याच्या संदर्भात विशेष न्यायालयाने सोमवारी झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे (जेआयपीएल) संचालकद्वय आर. सी. रुंगटा आणि आर. एस. रुंगटा यांना प्रत्येकी

नवी दिल्ली : कोळसा वाटप घोटाळ्याच्या संदर्भात विशेष न्यायालयाने सोमवारी झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे (जेआयपीएल) संचालकद्वय आर. सी. रुंगटा आणि आर. एस. रुंगटा यांना प्रत्येकी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. कोळसा घोटाळ्यातील आपला पहिला निकाल जाहीर करताना विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांनी या दोन्ही आरोपींना कारावासाच्या शिक्षेसोबतच प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला. याआधी न्या. पाराशर यांनी या दोघांना झारखंड येथील कोळसा खाणपट्टा मिळविण्यासाठी सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपात दोषी ठरविले होते. न्या. पाराशर यांनी रुंगटा यांच्यासोबतच आरोपी ठरविण्यात आलेल्या जेआयपीएल कंपनीवर २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.कोळसा घोटाळ्याशी संबंधित विविध प्रकरणांमधील हे पहिलेच प्रकरण आहे की ज्यात दोन्ही रुंगटा आणि जेआयपीएलला दोषी ठरविण्यात येऊन शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपींनी झारखंडमध्ये कंपनीला उत्तर धादू कोळसा खाणपट्टा वाटप व्हावा यासाठी फसवणूक करण्याच्या इराद्याने सरकारला धोका दिला, असे न्यायालयाने गेल्या २८ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय देताना म्हटले होते.उत्तर धादू कोळसा खाणपट्टा जेआयपीएल, मेसर्स इलेक्ट्रो स्टील कास्टिंग लिमिटेड, मेसर्स आधुनिक अलाईज अ‍ॅण्ड पावर लिमिटेड आणि मेसर्स पवनजय स्टील अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपन्यांना संयुक्तपणे वाटप करण्यात गैरप्रकार झाल्याचे २७ आणि २८ व्या चौकशी समितीने म्हटले होते. याआधी न्यायालयाने रामअवतार केडिया व नरेश महतो या अन्य दोन आरोपींनाही समन्स जारी केला होता. परंतु या दोघांचे निधन झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्याविरुद्धची कार्यवाही बंद करण्यात आली. कोळसा वाटप घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयतर्फे चौकशी करण्यात आलेली आणखी १९ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.