व्हॉट्सॲपवरून अफवा पसरविणे भोवले ! १४ जणांवर कारवाई : मोबाईल तपासणीची मोहीम
By admin | Updated: August 11, 2015 22:23 IST
सोलापूर : व्हॉट्सॲपद्वारे चोरी अन् अपहरणाच्या अफवा पसरवून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारीही कारवाई सुरू ठेवली. बार्शीत ६, मंगळवेढ्यात ४ तर पंढरपुरात ४ अशा १४ जणांवर अफवा पसरवल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलण्यात आला. पोलिसांनी त्यांना तूर्त ताब्यात घेतलेले नाही. सोमवारी रात्री पोलिसांनी पंढरपूरमध्ये ४ ॲडमिन आणि ५ सदस्यांना ...
व्हॉट्सॲपवरून अफवा पसरविणे भोवले ! १४ जणांवर कारवाई : मोबाईल तपासणीची मोहीम
सोलापूर : व्हॉट्सॲपद्वारे चोरी अन् अपहरणाच्या अफवा पसरवून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारीही कारवाई सुरू ठेवली. बार्शीत ६, मंगळवेढ्यात ४ तर पंढरपुरात ४ अशा १४ जणांवर अफवा पसरवल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलण्यात आला. पोलिसांनी त्यांना तूर्त ताब्यात घेतलेले नाही. सोमवारी रात्री पोलिसांनी पंढरपूरमध्ये ४ ॲडमिन आणि ५ सदस्यांना अटक केली होती.गेल्या १५-२० दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्यात येत होत्या. जिल्ह्यात चोर, दरोडेखोरांच्या भीतीने ग्रामस्थ अख्खी रात्र जागून काढत आहेत. दोन-तीन दिवसांपासून पोलिसांनी प्रकरणाचा मुळाशी जाऊन शोध घेतल्यानंतर घटनेमागील कारण स्पष्ट झाले. त्यानुसार व्हॉट्सॲपच्या ॲडमिनविरोधात कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)------मोबाईलची तपासणीग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यात २३ पोलीस ठाणे आणि औटपोस्ट आहेत. सोमवारी रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी मोबाईल तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. मंगळवारी दिवसभरात हजारो मोबाईलची तपासणी करण्यात आली. -----------