शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तिहार तुरुंगवासातील 'त्या' गूढ आवाजांनी कैद्यांची उडवली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 11:08 IST

तुरुंगवास म्हणजे एक भयंकर शिक्षा, अशी प्रत्येक सामान्य माणसाची धारणा आहे.

नवी दिल्लीः तुरुंगवास म्हणजे एक भयंकर शिक्षा, अशी प्रत्येक सामान्य माणसाची धारणा आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बऱ्याचदा तुरुंगवासाची हवा खावी लागते. दिल्लीतलं तिहार तुरुंगही अशा कैद्यांना शिक्षा भोगण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण तिहारमधले कैदी सध्या दुसऱ्याच कारणास्तव घाबरले आहेत. तिहार तुरुंगात आजकाल चित्र-विचित्र आवाज ऐकायला येऊ लागले आहेत. त्यामुळे महिला कैद्यांमध्ये जास्त करून भीतीचं वातावरण आहे. काही महिला कैद्यांच्या मते, त्यांना रात्री एका महिलेची सावली दिसत असून, ती महिला रडत असल्याचंही ऐकायला येतं. त्यामुळे मध्यरात्री दोन वाजता या कैदी महिला घाबरतात आणि जोरजोरात ओरडू लागतात. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतीची ही स्थिती तिहारमधल्या जेल नंबर 6मध्ये आहेत. बऱ्याचदा रात्री दोन वाजता एक महिला रडत असल्याचा आवाज या महिला कैद्यांना ऐकू येतो. तर काही महिला कैद्यांनी हा आवाज दुपारच्या दरम्यानही ऐकू येत असल्याची तक्रार केली आहे.  महिला कैद्यांचा दावा आणि रहस्यमयी आवाजांचं गूढ काय आहे, यासंदर्भात अद्याप काहीही समजलेलं नाही. तिहार तुरुंगवासात अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत.एका कैदी महिलेनं इथे आत्महत्या केली होती, तिचाच आवाज आणि तिचाच आत्मा भडकत दिसत असल्याची चर्चा आहे. आत्महत्या करणारी ती महिला निर्दोष होती, अशीही दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. परंतु विज्ञानाच्या जगतात या सर्व गोष्टी काल्पनिक असल्याचंही काहींचं मत आहे. तिहार तुरुंगातील या घटनांनी सध्या कैद्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक कैदी या आवाज आणि सावलीमुळे आजारी पडत आहेत.