शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी भाजपाचे देशभरात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:18 IST

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे कामकाज होऊ न शकल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे खासदार, आमदार, नेते, कार्यकर्त्यांनी देशभर गुरुवारी उपोषण केले.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे कामकाज होऊ न शकल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे खासदार, आमदार, नेते, कार्यकर्त्यांनी देशभर गुरुवारी उपोषण केले. भाजपाने केलेले उपोषण हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उपोषणाच्या दिवशी कामकाज केले. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकमध्ये तर प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल आदी भाजपा मंत्र्यांनी देशभरात विविध ठिकाणी उपोषण केले. या सर्वांनी काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला.>मुख्यमंत्र्यांचेमुंबईत उपोषणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलेपार्ले येथील भाजपा कार्यालयात उपोषणात सहभागी झाले. खा. पूनम महाजन, खा. परेश रावल, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार व आ. पराग अळवणी या वेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे उपोषण केले.>पुण्यात सॅन्डविच, वेफर्स खाऊन उपोषण!पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर व मावळचे बाळा भेगडे यांनी सॅन्डविच व वेफर्स खाऊन उपोषण केल्याचा व्हिडीओ दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे भाजपाच्या उपोषणाचा पुरता फज्जा उडाला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम व जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत आमदार भीपराव तापकीर, बाळा भेगडे यांना उपोषणाचा विसर पडला. बैठकीत ब्रेड सँडविच, वेफर्स, बाकरवडी आणि काजू कतलीवरही त्यांनी ताव मारला.सकाळी चहा-नाश्ता, दुपारनंतर उपोषणभाजपाच्या खासदारांनी गुरुवारी आपापल्या मतदारसंघांत वा राज्यात उपोषण केले. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपण दुपारनंतर उपोषण करणार असल्याचे सांगितले. त्या नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी आल्या असताना, त्यांचा काही ठिकाणी चहा व नाश्ता झाला. त्यामुळे दुपारनंतर मी उपोषण करणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.