ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. ३ - आरएसएस हा अविवाहितांचा क्लब असून मुले जन्माला घालण्याबाबत त्यांनी उपदेश करू नयेत अशी टीका एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसींनी केली आहे.
एमआयएम पक्षाच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून संघाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. संघनेते हे अविवाहित असून जनतेला चार मुले जन्माला घालण्याबाबत उपदेश करतात. जनता चारच काय पण १० - १५ मुलेही जन्माला घालेल परंतू, त्यांच्या शिक्षण आणि इतर मुलभूत हक्कांची जबाबदारी संघ घेईल का, असा सवाल त्यांनी केला. तसेच अविवाहित असल्याने संघनेत्यांना संसारातील जबाबदा-यांची जाणिव नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे सर्व मुस्लीम नागरिकांनी आपल्या हक्कासाठी एकत्र यायला हवे, असे न केल्यास मुस्लिमांचे अस्तित्व धोक्यात येईल असेही ते म्हणाले.