शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांवरील बंदीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप नाराज; पुनर्विचार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:44 IST

दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात फटाक्यांवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना आवडलेला नाही.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात फटाक्यांवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना आवडलेला नाही. हजारो लोकांच्या रोजीरोटीशी संबंधित या प्रश्नावर पुनर्विचार करण्याची मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे, तर विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा धार्मिक भावनांशी जोडला आहे.स्वदेशी जागरण मंचचे सहसंयोजक अश्विनी महाजन म्हणाले की, फटाक्यांच्या व्यवसायावर अनेक लोक अवलंबून आहेत. त्यामुळे प्रदूषण होत असले तरी चिनी फटाक्यांनी अधिक नुकसान होते. चिनी फटाक्यांवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले असून, त्याचा फटका सर्व नियम पाळणाºया भारतीय फटाका व्यवसायाला बसायला नको. या निर्णयाचा सर्वाधिक फटका किरकोळ व्यापाºयांना बसणार आहे. त्यांनी आधीच फटाके खरेदी करून ठेवले आहेत.विहिंपचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार देत स्पष्ट केले की, हल्ली दिवाळीपेक्षा नववर्षाच्या स्वागताला अधिक फटाके वाजविले जातात. हिंदू परंपरांवर प्रश्न उपस्थित करणे हल्ली फॅशन झाले आहे. प्रदूषणाची आठवण हिंदू परंपरांच्या संदर्भातच येते. बकरी ईदच्यावेळीही प्रदूषण होतेच. यावरही विचार केला जावा.शेतीतील काडीकचरा जाळणे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. हे रोखण्यासाठी सरकारने योजना तयार करावी. विशेष म्हणजे दिवाळीच्या आसपासच दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांत मोठ्या प्रमाणात काडीकचरा जाळण्यात येतो. त्यावर लक्ष दिल्यास दिल्लीतील प्रदूषण कमी होईल, असे महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :CrackersफटाकेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCrackers Banफटाके बंदी