शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Amul कंपनीचे एमडी RS Sodhi यांचा १२ वर्षांनंतर अचानक राजीनामा, नेमकं कारण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:08 IST

देशात दूधाचा पुरवठा करणारी दिग्गज कंपनी अमूल लिमिटेडच्या (Amul Limited) व्यवस्थापकीय मंडळात एक मोठा बदल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली-

देशात दूधाचा पुरवठा करणारी दिग्गज कंपनी अमूल लिमिटेडच्या (Amul Limited) व्यवस्थापकीय मंडळात एक मोठा बदल करण्यात आला आहे. कंपनीचे एमडी आरएस सोधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सोधी यांच्या जागी आता GCMMF चे सीओओ जयन मेहता यांच्याकडे कंपनीच्या एमडी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोधी हे २०१० सालापासून कंपनीच्या संचालकपदी होते. 

पीटीआयच्या माहितीनुसार, अमूल कंपनीत सिनिअर सेल्स मॅनेजर पदापासून करिअरची सुरुवात केलेल्या सोधी यांना जून २०१० साली कंपनीनं प्रमोशन देत एमडी बनवलं होतं. चार वर्षांपूर्वी त्यांच्या एमडी पदाचा कार्यकाळ पाच वर्षांनी पुन्हा वाढवण्यात आला होता. गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेल्या राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. अमूल ब्रँडचं काम सांभाळणारी ही मूळ कंपनी आहे. 

सोधी यांचं करिअरआरएस सोधी यांचं पूर्ण नाव डॉ. रुपिंदर सिंग सोधी असं आहे. त्यांनी पहिल्यांदा १९८२ साली अमूल कंपनीत एन्ट्री घेतली. २०००-२००४ पर्यंत त्यांनी जनरल मार्केटिंग मॅनेजर पद सांभाळलं. त्यानंतर जून २०१० साली त्यांना एमडी पदाची जबाबदारी देण्यात आली. जुलै २०२२ मध्ये त्यांना देशातील डेअर उद्योगाची प्रमुख असलेल्या इंडियन डेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं होतं. 

बोर्ड बैठकीत राजीनामा स्वीकारलाGCMMF बोर्डाचे चेअरमन शामलभाई पटेल आणि व्हाइस चेअरमन वालमभाई हम्बल यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत सोधी यांचा राजीनामा स्वीकारला गेला. आरएस सोधी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी आता जयन मेहता यांना प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

अमूल दररोज किती दूध सप्लाय करतं?गेल्या सात दशकांहून अधिक काळापासून अमूल ब्रँड देशात घरोघरी पोहोचला आहे. अूल गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये दूधाचा पुरवठा करतं. कंपनी दररोज जवळपास १५० लाख लीटरहून अधिक दूध पुरवते. यात एकट्या दिल्ली-एनसीआर भागात जवळपास ४० लाख लीटर दूधाचा पुरवठा केला जातो.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा