शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

म्हाडाला दिले १८ कोटी (लिड)

By admin | Updated: January 22, 2015 00:06 IST

तीर्थस्थळ शेगावचा विकास: शासनाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

तीर्थस्थळ शेगावचा विकास: शासनाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
नागपूर : संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील पार्किंगसाठी निश्चित जागेवरील वस्तीच्या पुनर्वसनासाठी म्हाडाला १८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून म्हाडाला वस्तीतील नागरिकांसाठी घरे बांधून द्यायची आहेत. शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. त्यावर न्यायालयाने म्हाडाला पैसे मिळाल्यानंतर काय केले यासंदर्भात दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार ११ जानेवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत किती विकासकामे पूर्ण झाली, किती विकासकामे प्रगतीपथावर आहेत व किती विकासकामे करायची आहेत याचा फेरआढावा बैठकीत घेण्यात आला. यानंतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला. यासंदर्भात विस्तृत माहितीही न्यायालयासमक्ष सादर करण्यात आली.
---------------------------
चौकट.....
रेल्वेस्थानकावर दुसरा फुटओव्हर ब्रिज
संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक येत असल्यामुळे रेल्वेस्थानकावरील एकमेवर फुटओव्हर ब्रिज अपुरा पडतो. त्यावर भाविकांची कोंडी होते. यामुळे दुसरा फुटओव्हर ब्रिज बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. रेल्वेने दुसरा फुटओव्हर ब्रिज बांधण्याची तयारी दर्शविली आहे, पण खर्च शासनाकडून मागितला आहे. हा मुद्दा पुढील सुनावणीत विचारात घेण्यात येणार आहे.