नवी दिल्ली : विदेशी चलनात चढ-उतार पाहता मारुती सुझुकी इंडिया नवीन मॉडेलवर सुझुकी मोटार कॉर्पला जपानी चलनाऐवजी (येन) भारतीय रुपयात रॉयल्टी देणार आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन आर. सी. भार्गव यांनी ही घोषणा केली.
चलनातील चढ-उताराचा कंपनीला फटका बसू नये, हा यामागचा हेतू आहे. कंपनीने संशोधन व विकासाची क्षमता वाढविण्याचाही निर्णय घेतला, तसेच सुझुकी मोटारच्या सहकार्याने संयुक्त उत्पादन विकासात मोठी भूमिका निभावणार आहे. त्यामुळे रॉयल्टी कमी होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जनू 2क्14 च्या पहिल्या तिमाहीत मारुती सुझुकी इंडियाने 689 कोटी रुपयांची रॉयल्टी दिली होती. हे प्रमाण एकूण विक्रीच्या 6.2 टक्के आहे. मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात आल्यानंतर रॉयल्टी कमी होईल. कारण मारुतीचा सुझुकी मोटारसोबत संयुक्त उत्पादन विकासात सहभाग असणार आहे.
संशोधन आणि विकासासाठी 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून यातून हरियाणात एक टेस्ट ट्रॅक तयार केला जाणार आहे. पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला मारुती सुझुकी इंडिया एसयूव्ही श्रेणीची वाहने आणणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्प्रकल्पांना गतिमान
मंजुरी देण्यात आपले राज्य पहिले असल्याचा दावा करणा:या मोदी सरकारच्या गुजरातमधील प्रकल्पाबाबत मारुती कंपनीने तूर्तास ‘गो स्लो’चे धोरण अवलंबिले आहे.
च्बाजारात मंदीचे वातावरण असल्याने किमान एक वर्ष आपला प्रकल्प पुढे ढकलत असल्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला आहे.
च्कंपनीच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कंपनीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी सांगितले की, गुजरातमध्ये कंपनीचा उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा मानस असून या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य मारुतीची मूळ कंपनी असलेल्या सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशनतर्फे होणार आहे.
च्मात्र, मारुतीच्या ब्रँडनेम अंतर्गत हा साकारला जाईल. परंतु, अद्यापही मंदीचे सावट कायम असल्याने 2क्17 र्पयत तरी हा प्रकल्प कार्यान्वित होणार नाही.