शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत नद्यांचे रौद्र रूप

By admin | Updated: August 2, 2015 03:54 IST

देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत.

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत. गुजराततेत ठिकठिकाणी आलेल्या पुरात ६० जण तर पश्चिम बंगालमध्ये ४० लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगा, यमुना, राप्ती, घागरा आणि शारदा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांनी रौद्ररूप धारण केले असल्याने काठावरील भागात दहशत पसरली आहे. बलिया, वाराणसी आणि अलाहाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकवस्तीत पाणी शिरले असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक गावांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर आधीच ४ लाख लोक प्रभावित झालेल्या ओडिशात पुराचा व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात ‘कोमेन’ चक्रीवादळ धडकल्यानंतर प्रचंड पाऊस कोसळत आहे. याशिवाय गुजरात व राजस्थानात मागील दोन दिवसांपासून संततधार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने मोठे क्षेत्र पाण्याखाली बुडाले. कोमेन वादळामुळे ओडिशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे स्पेशल रिलिफ कमिशनर जी.व्ही.व्ही. शर्मा यांनी दिली. मिझोरम, त्रिपुरा आणि आसाममध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.जनजीवन विस्कळीत; रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली असून, कोलकाता शहरातील बहुतांश भागात पाणी शिरले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, उद्यापर्यंत गंगेलगतच्या पश्चिम बंगालच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोमेन चक्रीवादळ गुरुवारी बांगलादेशात पोहोचले होते. राजस्थानात अनेक गावे पाण्यातराजस्थानच्या जालौर, सिरोही आणि बिकानेर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. जालौर जिल्ह्यातील सांचौर, भीनमाल, सरवाडा आणि चितळवाडासह नर्मदा धरणाच्या आजूबाजूच्या गावांत पाणी शिरल्याने मार्ग बंद पडले आहेत.