शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राऊंड टेबल कटिबद्ध पराग शहा : राऊंड टेबलच्या अध्यक्षपदी आशिद पंचमिया

By admin | Updated: August 14, 2015 00:32 IST

सोलापूर :

सोलापूर :
सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या माध्यमातून कुंभारीच्या विडी घरकूलमधील शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचा लाभ कर्मचारी वर्गातील अडीच हजार विद्यार्थ्यांना मिळत आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राऊंड टेबल कटिबद्ध असल्याची माहिती मावळते अध्यक्ष पराग शहा यांनी दिली. यावेळी नूतन अध्यक्षपदी आशिद पंचमिया यांची निवड करण्यात आली.
गोवा येथे झालेल्या सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या वार्षिक सभेत पराग शहा बोलत होते. यावेळी राऊंड टेबलच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली़ ते पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी आशिद पंचमिया, सचिव-रोहन शालगर, उपाध्यक्ष-स्वप्निल मर्दा, खजिनदार-कपिल जाजू यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. बैठकीस विष्णू राठी, पराग डाळे, अनुप मालपाणी, निखिल सुराणा, वासुदेव बंग, गिरीश मुंदडा आदी उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष पराग शहा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आशिद पंचमिया यांना सुपूर्द केली.
यावेळी पराग शहा म्हणाले की, सोलापुरात मोठ्या प्रमाणात विडी उद्योगात कर्मचारी वर्ग काम करीत आहे. या कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी उत्तम शिक्षण एक परिपूर्ण वास्तूमध्ये मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कंुभारी येथील गोदुताई परूळेकर विडी घरकूल परिसरात शाळेची इमारत बांधण्यात आली. या मुलांच्या भविष्यासाठी सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलचे कार्य जोमाने सुरू आहे. राऊंड टेबलच्या देशव्यापी शैक्षणिक कार्यामुळे भारताचे शिक्षणातून स्वातंत्र्याचे लक्ष्य पूर्ण होत आहे. देशभरातील ८0 लाख शाळाबा‘ मुलांपैकी किमान १0 लाख मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे नियोजन राऊंड टेबलचे आहे असे शहा यांनी सांगितले.
सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या कार्याची गती अधिक होती तितक्याच ताकदीने पुढे जाईल. यामध्ये कुठेही फरक पडणार नाही. गरीब गरजू मुलांच्या शिक्षणासाठी अधिक परिश्रम घेईन, असे आश्वासन यावेळी नूतन अध्यक्ष आशिद पंचमिया यांनी दिले. (प्रतिनिधी)
फोटो ओळ : सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या वार्षिक सभेत डावीकडून पराग शहा, स्वप्नाली मर्दा, हितेश केअरिंग, आशिद पंचमिया, रोहन शालगर पाठीमागे डावीकडून कपिल जाजू, अनूप मालपाणी, विष्णू राठी, पराग डाळे, निखिल सुराणा आदी. (फोटो नं.-१३ एच.आर.१३)