शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 2:20 PM

राहुल गांधी म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच काँग्रेस शासित राज्यांमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, बेरोजगारी, कृषी संकट, चीनचा ताबा- या सर्वांचे मूळ एकच आहे. अहंकार, मित्रप्रेम आणि मोदी सरकारचे अपयश, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी करुन केंद्रावर टीका केली आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कुटुंबीयांना नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी लोकसभेत सरकारकडे केली आहे. यासोबतच त्यांनी लोकसभेत कृषी कायद्याविरोधी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी सादर केली. 

'लोकसभेतून विरोधकांचा वॉकआउट'

आंदोलनादरम्यान पंजाबमधील 400 आणि हरियाणातील 70 शेतकऱ्यांची यादी सुपूर्द करताना ते म्हणाले की, पीडित शेतकरी कुटुंबांना भरपाई आणि रोजगार मिळावा, अशी माझी इच्छा आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी नाही, आम्ही तुम्हाला नाव आणि पत्ता देत आहोत. त्यांची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी केली. पण, सत्ताधारी पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रसने सभात्याग केला. 

पंजाब सरकारकडे आकडेवारी

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, शेतकरी आंदोलनात किती शेतकरी मरण पावले याची आकडेवारी सरकारकडे का नाही? पंजाब सरकारने 403 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंजाब सरकारकडे यादी आहे, तर भारत सरकारकडे का नाही? भारत सरकारने शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीची पडताळणी करून त्या सर्वांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन