आग्रा : प्रेमाचे ऐतिहासिक प्रतीक तथा जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट ताज महालचे आरस्पानी सौंदर्य आता यमुनातीरावरील मेहताब बागेतून न्याहाळण्याची संधी लवकरच रसिक प्रेमवीरांना मिळणार आहे. चांदण्या रात्री ताजमहालचे सौंदर्य डोळा भरून पाहता यावे, यासाठीची औपचारिकता पूर्ण केली जात असून] जुलैपासून ही व्यवस्था अमलात येणार आहे. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनीच तशी घोषणा केली आहे. त्यांनी गुरुवारी रात्री मेहताब बागेतून ताजमहालचे निरीक्षण केले. देशात सर्वाधिक पर्यटक ताजमहालला भेट देत असले, तरी आपल्याला पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची पूर्ण क्षमता मिळवता आलेली नाही. ताजमहाल बघून रात्रीला परतणाऱ्या पर्यटकांनी रात्रीला आग्य्रातच थांबावे, यासाठी मेहताब बाग हे चांगले आकर्षण बनू शकते. त्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सिंह यांच्याशी चर्चाही केली आहे, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
चांदण्या रात्री ‘ताज’चे रोमँटिक दर्शन !
By admin | Updated: May 4, 2015 02:42 IST