शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामांबाबतची भूमिका बदलली नाही, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:44 IST

तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही़ त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही. त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. दलाई लामा यांच्या कार्यक्रमांपासून दूर राहा, असे फर्मान परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंत्री व सनदी अधिका-यांना गेल्या महिन्यात बजावले होते. चीनचे परराष्ट्र मंत्री व सचिव यांची भेट घेण्यासाठी गोखले चीनला गेले होते. त्याआधी त्यांनी हे फर्मान जारी केले. या फर्मानाचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले होते.त्यावर खुलासा करताना परराष्ट्र मंत्रालयाने वरील स्पष्टीकरण दिले़ दलाई लामांबाबत कोणतेही फर्मान जारी केलेले नाही. लामांविषयी भारताने भूमिका बदललेली नाही. त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.>लामा यांना आश्रय देऊ नका- चीनभारत व चीनमध्ये युद्ध सुरू होईल, असे चित्र गेले काही महिने सीमारेषेवर होते़ युद्धजन्य परिस्थिती निवळण्यासाठी उभय देशांमध्ये चर्चा सुरू आहे़ दलाई लामांविषयी चीन सुरुवातीपासूनच द्वेषी आहे़ लामा यांना आश्रय देऊ नका, असे जाहीरपणे चीन सर्व देशांना सांगतो़ भारत सरकार मात्र दलाई लामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे़अचानकपणे मोदी सरकारने लामांविषयी भूमिका बदलल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लामा समर्थक देशांच्या भुवया उंचावल्या होत्या़ लामा यांनी याविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही़इंग्रजी दैनिकाचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर केंद्र सरकारवर चांगलीच टीका झाली़ चीनला खूश करण्यासाठी हे फर्मान जारी केले होते, असा आरोपही झाला होता़ केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केल्याने हा वाद निवळण्याची चिन्हे आहेत़

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा