शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

जय हो! इस्रो बनवणार स्वत:चं स्पेस स्टेशन, सादर केला २०३५ पर्यंतचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 18:47 IST

भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक योजना सादर केली आहे.

भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक योजना सादर केली आहे. ISRO ने जड पेलोड्स कक्षेत टाकण्याचा आणि पुन्हा वापरता येण्याजोगा रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रॉकेटला नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल्स (NGLV) असे म्हणतात. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळ संस्था रॉकेटच्या डिझाईनवर काम करत आहे आणि त्याच्या विकासात उद्योगांनी सहकार्य करावे अशी त्यांची इच्छा आहे.

विकास प्रक्रियेत उद्योग क्षेत्रालाही सोबत आणण्याचा मानस आहे. आम्हाला सर्व पैसे गुंतवण्याची गरज नाही. आपल्या सर्वांसाठी हे रॉकेट तयार करण्यासाठी उद्योग जगतानंही गुंतवणूक करावी अशी आमची इच्छा आहे. रॉकेट १० टन पेलोड जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (जीटीओ) किंवा २० टन पेलोड कमी पृथ्वीच्या कक्षेत नेण्याची योजना आहे, असं सोमनाथ म्हणाले. 

इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नवीन रॉकेट उपयुक्त ठरेल कारण भारत २०३५ पर्यंत आपले स्पेस स्टेशन स्थापन करण्याची योजना आखत आहे आणि अंतराळ मोहिमा, मानवयुक्त अंतराळ उड्डाण, मालवाहू मोहिमा आणि एकाच वेळी अनेक संचार उपग्रह कक्षेत ठेवण्यास सक्षम असेल. NGLV मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी एक साधे, मजबूत मशीन म्हणून डिझाइन केलं आहे. यामुळे अंतराळातील वाहतूक किफायतशीर होणार आहे.

२०३० पर्यंत लॉन्चिंगची योजनाध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) 1980 च्या दशकात विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि भविष्यात रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत. ISRO ने एका वर्षात NGLVs डिझाइन करण्याची योजना आखली आहे आणि २०३० मध्ये त्याच्या पहिल्या लॉन्चसह उत्पादनासाठी उद्योगाला ऑफर केले जाऊ शकते.

रॉकेटची किंमत हजारो डॉलर्सNGLV हे मिथेन आणि द्रव ऑक्सिजन वापरून हरित इंधनावर चालणारे तीन-टप्प्याचे रॉकेट असू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला एका परिषदेत सोमनाथ यांनी मांडलेल्या योजनेनुसार, NGLV पुन्हा वापरता येण्याजोग्या स्वरूपात प्रति किलो १,९०० डॉलर खर्च अपेक्षित आहे. 

टॅग्स :isroइस्रो