शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटिक्स स्पर्धेत ‘रोबोनिस्ट’ अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 01:57 IST

प्रतिभेचा शोध; जागतिक स्पर्धेत औरंगाबादच्या विद्यार्थ्यांची कामगिरी

नवी दिल्ली : जिकडे पाहावे तिकडे रोबोट्स. विद्यार्थ्यांच्या हाती ड्रोन, रॉकेट्स... छोटीशी मोटर, रिमोट कंट्रोल, वायर्स अशा वस्तूंसह असंख्य मुले-मुली रोबोटिक्सच्या जादुई विश्वात रमली आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टच्या टीमने अंतिम फेरीत धडक मारली आहे.आॅल इंडिया कॉन्सिल फॉर रोबोटीक्स आॅटोमेशनच्या वतीने पाचव्यांदा 'जागतिक रोबोटीक्स अजिंक्यपद स्पर्धा - टेक्नोशियान २०१९' आयोजित करण्यात आली आहे. त्यात २० देशांमधून २८ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. २३ सप्टेंबरला सुरु झालेल्या या स्पर्धेचा बुधवारी समारोप होईल.रोबोटीक्स म्हणजे रोजचे जगणे सुलभ करणाऱ्या मशिन्सचे विज्ञान, अशी सहज व्याख्या करणारा विद्यार्थी श्रीवर्धन टाकळकर महिनाभरापासून मित्रांसह रोबोटमय झाला. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्येच तयारी केली. शाळा संपल्यावर दुपारचा वेळ, शनिवार-रविवारची सट्टी रोबोट बनवण्यात घालवली.बंदीस्त शाळेबाहेर रोबोटीक्सचे शिक्षण देण्यासाठी धडपडणारे रोबोनिस्ट टेक सोल्युशन्स प्रा. लि.चे दीपक कोलते व त्यांच्यासारखेच इंजिनिअर मित्र आणि त्यांची वीस जणांची टीम स्पर्धेत सहभागी झाली आहे. कोलते म्हणाले, यातून जागतिक स्पर्धेचा अनुभव मुलांना मिळतो. विज्ञान-तंत्रज्ञान जे शाळेत शिकतो ते प्रत्यक्ष इथे वापरता येते. स्पर्धेसाठी रोबोट तयार केला. त्याची लांबी, रुंदी, वजन, आकार ठरवून देण्यात आला. आम्ही मुलांना कामे नेमून दिलीत. प्रत्येकाने त्याचे काम चोख बजावले.रोबोट्स स्पर्धेत एका मार्गावर रोबो चालवून दाखवावा (रोबो रेस) लागतो. त्यावर असंख्य अडथळे असतात. ते पार करायचे. आम्हाला अडथळे लक्षात आले. ऐनवेळी बदल करणे शक्य नव्हते. आमच्या रोबोटच्या चाकांमध्ये छोटीशी जागा होती. आम्ही त्यात माचिसच्या काड्या बसवल्या, अशा ट्रीक्स वापरल्याचे नमूद करुन कोलते म्हणाले, आम्हाला 'क्रिएटीव्ह ब्रेन' तयार करायचे आहेत. त्यासाठी स्पर्धांचे जास्तीत जास्त आयोजन व्हायला हवेत. जिल्हा- राज्य- राष्ट्रीय व नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल तर सर्वच स्तरातील मुला-मुलींना त्यात सहभागी होता येईल. विद्यार्थी आसीम म्हणाला, स्पर्धेसाठी खूप तयारी केली. नियम समजावून घेतले. लांबी-रुंदी, वजनानुसार कोणती मोटर रोबोटमध्ये असेल, याचाही विचार केला.टीम रोबोनिस्ट : दीपक कोलते, अभिजित बोडके, मोझेस खरात, चेतन पवार, प्रदीप सहाने, निमिष पाटणी, सनी सुखदे, अश्विन पाटील.सहभागी स्पर्धक : आर्यवीर दर्डा, आंचल सक्सेना, कौस्तुभ कुलकर्णी, ओंकार गोरडे, नील मपारी, आसीम राक्षसभुवनकर, सिद्धांत शर्मा, प्रणव वेदपाल, समर जोशी, पी.एस. प्रत्युक्ष, रिद्धिमा तुलशन, पृथ्वीर गाडेकर, शुभम कागलीवाल, रेयांश माछार, श्रीवर्धन , मैत्रैय दुसाने व योगेश मोरे.