ंचाकूचा धाक दाखवून लुटले
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
पुणे : चाकुचा धाक दाखवून एका तरूणाला टिळक रस्त्यावरून औंध परिसरात नेऊन लुटले. तरूणाकडील २ मोबाईल, सोन्याची अंगठी असा एकूण १९ हजार रूपयांचे ऐवज चोरले. याप्रकरणी एका २४ वर्षीय युवकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
ंचाकूचा धाक दाखवून लुटले
पुणे : चाकुचा धाक दाखवून एका तरूणाला टिळक रस्त्यावरून औंध परिसरात नेऊन लुटले. तरूणाकडील २ मोबाईल, सोन्याची अंगठी असा एकूण १९ हजार रूपयांचे ऐवज चोरले. याप्रकरणी एका २४ वर्षीय युवकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.सूरज रविंद्र कांबळे (वय २४, रा रामनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. राहूल सुरेश जैन (वय ३१, रा. सुखसागरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. जैन हे दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास टिळक रस्त्यावरून घराकडे चालले होते. त्यावेळी आरोपीने स्वत:ची दुचाकी आडवी घालून त्यांना थांबविले व त्यांना चाकूाचा धाक दाखवून ओैंध येथे दुचाकी नेण्यास भाग पाडले व तेथे जाऊन त्यांच्याकडील मोबाईल व अंगठी चोरली. आरोपीकडन माल हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिल सुप्रिया मोरे यांनी केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्रा धरला.