संस्थाचालकांची दुरु स्ती साठी कसरतपेठ : तालुक्यातील सुरगाणे(उंबरपाडा) येथील शारदा प्राथमिक शाळेचे पत्रे वादळात ऊडून मोठे नुकसान झाले असून आता शाळेची दुरु स्ती कशी करावी या विवंचनेत संस्थाचालक अडकल्याने ऐन पावसाळ्यात विद्यार्थांना ऊघडयावर बसावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.सुरगाणे ( उंबरपाडा) येथे खाजगी संस्थेने प्राथमिक शाळा सुरू केली. ग्रामस्थ व पालकांच्या श्रमदानातून मुलांसाठी काही वर्गखोल्या बांधल्या शाळेला शासनाचे कोणतेही अनुदान नसल्याने आधीच १५ -२० वर्षापासून बिनपगारी शिक्षकांनी व संस्थाचालकांनी पदरमोड करून ऊभारलेली शाळेच्या इमारतचे मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसात मोठया प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने शाळेला सुट्या असल्याने विद्यार्थी नव्हते. मात्र शाळेचे संपूर्ण पत्रे व भिंतीची नासधूस झाल्याने आता शाळेची दुरु स्ती कशी करावी असा प्रश्न शिक्षक व संस्थाचालकासमोर ऊभा ठाकला आहे. याबाबत पंचनामा करून शासकिय मदत मिळावी अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर) (फोटो २२ सुरगाणा)फोटो -सुरगाणे (उंबरपाडा) येथील वादळाने नुकसानग्रस्त झालेली खाजगी प्राथमिक शाळेची इमारत.
विनाअनुदान शाळेचे छप्पर उडाले
By admin | Updated: May 23, 2016 00:12 IST