शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या कार्यालयावर आरजेडी समर्थकांचा हल्ला

By admin | Updated: May 17, 2017 17:00 IST

बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला

ऑनलाइन लोकमतपटना, दि. 17 - बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या बीर चंद पटेल रोडवरील भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून, अनेक गाड्यांची तोडफोडही केली आहे. या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवारातील मिसा भारती यांच्या नावावर दिल्लीतील उच्चभ्रू परिसरामध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे नुकतेच उघड झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानं छापेमारीही केली होती. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी सुनियोजित पद्धतीनं हल्ला केल्याचं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी या आरोपांचं खंडन करत भाजपा कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा वीट फेकल्याचं सांगितलं. पोलिसांनी दगडफेक करणा-यांची ओळख पटवली असून, त्यांच्याविरोधात कारवाईही केली आहे. शहर पोलीस अधीक्षक चंदन कुशवाह म्हणाले, भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करणारा कोणताही व्यक्ती असो, तो वाचणार नाही. आम्ही परिसरात अतिरिक्त पोलीस बल तैनात केले आहे. भाजपानं निवडणूक आयोगाकडे लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही मुलगे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव आणि आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन केलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी गेल्या आठवड्यात लालूप्रसाद यादव, त्यांची खासदार कन्या मीसा भारती आणि दोन्ही मुलांवर 1 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्ट लँड डील्समध्ये सहभागी होण्याचा आरोप केला आहे. बिहारमधील भाजपाचे अध्यक्ष नित्यानंद यांनी राष्ट्रीय जनता दलानं नैराश्येतून कार्यालयावर हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमधला भ्रष्टाचार आणि अराजकतेविरोधात भाजपा नेहमीच लढत राहील. आम्ही या लढाईला कोर्टासह लोकांमध्येही घेऊन जाऊ. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाच्या गुंडांविरोधात कारवाई केली पाहिजे, असं वक्तव्यही सुशील मोदी यांनी केलं आहे.