शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राजदला राज्यसभेची जागा देण्यास नकार

By admin | Updated: May 29, 2014 04:13 IST

लालूप्रसाद यादव यांच्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय संयुक्त जनता दलाने घेतला आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली - लालूप्रसाद यादव यांच्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय संयुक्त जनता दलाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता या पक्षाची राजदसोबत राजकीय आघाडी होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. बिहारमधील राज्यसभेच्या तीन जागांपैकी एक जागा राबडीदेवी यांच्यासाठी सोडण्यासही संयुक्त जनता दलाने स्पष्ट नकार दिला असल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील तुघलक मार्गावर असलेला २५ नंबरचा शासकीय बंगला आपल्याच ताब्यात राहावा, या उद्देशाने राबडीदेवी यांना राज्यसभेची एक जागा मिळावी, अशी लालूप्रसाद यादव यांची इच्छा आहे. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरविल्याकारणाने ते सध्या लोकसभा वा राज्यसभा यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची पत्नी राबडीदेवी यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. त्यामुळे आता संयुक्त जनता दलासोबत आघाडी करण्याची लालूप्रसाद यादव यांची इच्छा आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसल्याकारणाने लालूप्रसाद यांच्यावर दिल्लीतील शासकीय बंगला रिकामा करण्याची वेळ येऊ शकते. पूर्वीच्या संपुआ सरकारने ‘सामाजिक कार्यकर्ता’ या श्रेणीमध्ये हा बंगला आपल्या ताब्यात ठेवण्याची परवानगी लालूप्रसाद यांना दिलेली होती, अशी माहिती आहे. संजदचे अध्यक्ष शरद यादव हे बिहारमधून राज्यसभेवर निवडले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शरद यादव यांचा लोकसभा निवडणुकीत मधेपुरामधून पराभव झाल्याकारणाने आता त्यांना राज्यसभेची जागा देण्यात येईल, असे सांगितले जाते. नितीशकुमार यांचे विश्वासू मानले जाणारे माजी मुत्सद्दी पवन वर्मा यांच्या नावाचा या दुसर्‍या जागेसाठी विचार केला जाणार आहे. वर्मा हे अनेक वर्षांपासून संजदचे प्रवक्ते आहेत. याआधी नितीशकुमार यांनीही स्वत: राज्यसभेत जाण्याबाबत विचार केलेला होता. परंतु हा विचार त्यांनी आता बदलला आणि आमदार म्हणून पाटण्यातच राहण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेच्या तिसर्‍या जागेवर संजदतर्फे एखाद्या मुस्लीम उमेदवाराला उभे केले जाण्याची शक्यता आहे.