शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

RJD: 'अजानप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हटली पाहिजे, कॅसेट लावून चिटींग नको'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:35 IST

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात 3 मेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे

पाटणा - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर राज्यातील वातावरण तापलं असून मिशदींवरील भोंग्याचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच, राज ठाकरेंनी 1 मे रोजी आणखी एका जाहीर सभेची घोषणा केली असून 5 जून रोजी अयोध्या दौरा करत असल्याचेही सांगितले. त्यामुळे, मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य सरकारने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यावरुन, राज ठाकरेंवर अनेकांनी टिका केली आहे. त्यातच, राष्ट्रीय जनता दलाने ट्विट करुन मनसेवर उपहासात्मक टिका केली आहे.  

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात 3 मेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यातच, देशातील हिंदू बांधवांना आवाहनही केलं आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात राज ठाकरे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. मात्र, अनेकांनी राज यांच्यावर टिकाही केली आहे. राज ठाकरेंच्या आवाहनावर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही प्रतिक्रिया दिली आहे. 

''ज्याप्रमाणे नमाज 5 वेळा तोंडाने म्हटली जाते, त्याचप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हणायला हवी. कॅसेट वाजवून हनुमान चालिसा नको, असं झाल्यास आम्ही त्यास चिटींग समजू,'' असे राष्ट्रीय जनता दलाने म्हटले आहे.     राज यांच्या या भाषणानंतर पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा या संघटनेने मनसेला दिला होता. 

राज ठाकरेंना सुरक्षा देण्याची शक्यता

राज ठाकरेंना आता केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने धमकी दिली होती. त्यामुळे केंद्र सरकारकडून आता राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा काल पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलRaj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईMuslimमुस्लीम