शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

‘लोकमत’चे ऋषी दर्डा यांच्यासह २५ मान्यवर अबुधाबीच्या युवराजांच्या मेजवानीत सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 09:11 IST

भारत व संयुक्त अरब अमिराती (यूएई)यांच्यात गेल्या काही वर्षांत जे उत्तम राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज अल् नाहयान यांनी समाधान व्यक्त केले.

नवी दिल्ली - अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद नाहयान यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आयोजिलेल्या मेजवानीप्रसंगी लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासह २५ निवडक मान्यवर सहभागी झाले होते. या दौऱ्यात अबुधाबीच्या युवराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा केली.

युवराज या नात्याने पहिल्या अधिकृत विदेश दौऱ्यावर आलेले अल् नाहयान यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील हैदराबाद हाउस येथे मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंतप्रधान कार्यालय व परराष्ट्र खात्याकडून भारतातील उद्योग, माध्यम, शिक्षण, वैद्यकीय आदी क्षेत्रातील निवडक २५ जणांना  आमंत्रण देण्यात आले होते. भारत व संयुक्त अरब अमिराती (यूएई)यांच्यात गेल्या काही वर्षांत जे उत्तम राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज अल् नाहयान यांनी समाधान व्यक्त केले.

मेजवानीप्रसंगी कोण कोण होते उपस्थित?nपंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद नाहयान यांच्यातील चर्चेनंतर सोमवारी आयोजिलेल्या मेजवानीप्रसंगी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डाॅ. पी. के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी, आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक संजीव पुरी, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिव अनिता प्रवीण, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, यूएईतील भारतीय राजदूत संजय सुधीर, महिंद्रा समूहाचे सीईओ तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे प्रबंध संचालक डॉ. अनीश शाह, पंतप्रधानांचे संयुक्त सचिव दीपक मित्तल, लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांचा समावेश होता. 

तसेच या मेजवानीप्रसंगी ओएनजीसीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार सिंह, ऑइल इंडिया लिमिटेडचे (ओआयएल) अध्यक्ष व प्रबंध संचालक रंजीत रथ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विपणन विभागाचे संचालक व्ही. सतीश कुमार, पंतप्रधान कार्यालयाचे ओएसडी हिरेन जोशी, वरिष्ठ पत्रकार संजय पुगलिया,  इंडिया इंक ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज लाडवा आदी मान्यवरही होते. 

शुद्ध शाकाहारी भोजनभारत दौऱ्यावर आलेल्या यूएईच्या शिष्टमंडळाला शुद्ध शाकाहारी ‘सेवहन कोर्स मील’ देण्यात आले. या जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ता, गुलाबजाम, मटारपासून बनविलेले पदार्थ, कुल्फी आदी खाद्यपदार्थांचा समावेश होता. सर्व पाहुण्यांनी या जेवणाचा आस्वाद घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRishi Dardaऋषी दर्डा